दुबई: player of the month awards अर्थात आयसीसीने क्रिकेट अधिक रोमांच आणण्यासाठी एका नव्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. आतापर्यंत 'प्लेअर ऑफ द इयर'ची घोषणा करत होते. आता त्यांनी 'प्लेअर ऑफ द मंथ' देण्याची घोषणा केली आहे. वाचा- आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट चाहते प्रत्येक महिन्याला ऑनलाइन मत देऊ या खेळाडूंची निवड करू शकतात. यासाठी आयसीसीने स्वतंत्र अकादमी केली आहे. यात माजी खेळाडू आणि पत्रकारांचा समावेश आहे. वाचा- आयीसीसच्या या पहिल्या महिन्यातील पुरस्कारांच्या नामांकनामध्ये भारतीय संघातील जलद गोलंदाज मोहम्मद सिराज, फिरकीटपटू आर अश्विन आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारताचा युवा जलद गोलंदाज टी नटराजन देखील या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. वाचा- भारतीय खेळाडू वगळता इंग्लंडचा कर्णधार जो रूट, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, अफगाणिस्तानचा रहमानुल्लाह गुरबाज, दक्षिण आफ्रिकेचा मरिजाने काप आणि नादिन डे क्लार्क आणि पाकिस्तानचा निदा डार हे खेळाडू स्पर्धेत आहेत. वाचा- या पुरस्कारासाठी आयसीसी प्रत्येक विभागात तीन खेळाडूंचे नामांकन करेल. विजेत्या खेळाडूची घोषणा महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी केली जाणार आहे. एकूण मतांमध्ये या पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात आलेली अकादमीची मते ९० टक्के असतील. तर आसीसीच्या वेबसाइटचे नोंदणीकृत युझर्सची मते १० टक्के इतकी असतील. आयसीसीने हे पुरस्कार जाहीर केले असले तरी अनेक चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आयसीसीला ट्रोल केले आहे. आयसीसीकडून खेळाची प्रतिष्ठा कमी केली जात असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36nntV0
No comments:
Post a Comment