मुंबई: ऑस्ट्रेलियात विजय मिळवलेल्या टीम इंडियातील क्रिकेटपटू मायदेशात परतले आहेत. मुंबईतील खेळाडू आज सकाळी दाखळ झाले. भारतीय संघातील उपकर्णधार ( ) याने मुंबईत आल्यानंतर एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. रोहितची ही पोस्ट व्हायरल होत आहे. वाचा- बीसीसीआयकडून आयपीएल २०२१ची तयारी सुरू आहे. स्पर्धेतील आठ संघांनी कालच रिटेन आणि रिलीझ करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यात अनेक संघांनी दिग्गजांना बाहेर बसवले आहे. () संघाने दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा ()ला रिटने केले नाही. त्यानंतर मलिंगाने लीग क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मुंबई संघाकडून हे स्पष्ट करण्यात आले की स्वत: मलिंगाने निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे त्याला रिटने केले गेले नाही. वाचा- मलिंगाच्या या निवृत्तीवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. क्रिकेटने एक सर्वोत्तम खेळाडू पाहिला आहे. एक खरा सामना जिंकणारा खेळाडू. मी त्याला खुप मिस करेन, असे रोहितने पोस्टमध्ये म्हटले आहे. रोहिने मलिंगासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. वाचा- वाचा- फक्त रोहित शर्मा नाही तर मुंबई इंडियन्स संघाने देखील मलिंगाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने आम्हाला जल्लोष करण्याचे १७० क्षण दिले असे मुंबई संघाने म्हटले आहे. आयपीएलच्या इतिहासात मलिंगाच्या नावावर सर्वाधिक १७० विकेट आहेत. मुंबई इंडियन्सकडे आता १८ खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे ७ जागा रिक्त आहेत. ज्यासाठी ते आयपीएल २०२१च्या मिनी लिलावात बोली लावतील. वाचा- वाचा- मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले खेळाडू रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंह, सौरव तिवारी, अदित्य तरे, कायरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणार पंड्या, अनुकूल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी आणि मोहसिन खान वाचा- रिलीझ केलेले खेळेडू लसित मलिंगा, मिशेल मेक्लेनाघन, जेम्स पॅटिंसन, नाथन कुल्टन नाइल, सेर्फने रादरफोर्ट, प्रिंस बलवंत रॉय, दिग्विजय देशमुख हे सर्व खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3c5tNEl
No comments:
Post a Comment