नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या () स्पर्धेत ()ने धमाकेदार फलंदाजी केली. इंग्लंडच्या या स्फोटक खेळाडूने सिडनी सिक्सर्सच्या विरुद्ध फक्त ५६ चेंडूत ११० धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे सिडनी थंडर्सने ५ विकेटच्या बदल्यास २३२ धावा केल्या. वाचा- एलेक्स हिल्सचे बिग बॅश लीग स्पर्धेतील हे पहिले शतक ठरले. त्याच बरोबर सिडनी थंडर्सने या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली. शुक्रवारी झालेल्या सान्यात थंडर्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने २० षटकात ५ बाद २३२ धावा केल्या. उत्तरादाखल सिडनी सिक्सर्सला ५ बाद १८६ धावा करता आल्या. थंडर्सने हा सामना ४६ धावांनी जिंकला. वाचा- एलेक्सला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याने १९६.४३च्या स्ट्राइक रेटने ९ चौकार आणि ८ षटकारांसह ५१ चेंडूत शतक झळकावले. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो आघाडीवर आहे. त्याने १२ डावात ४६२ धावा केल्या आहेत. वाचा- एलेक्सच्या या धमाकेदार खेळीची चर्चा सोशल मीडियावर झाली नसती तरच नवल. चाहत्यांनी त्याच्या या स्फोटक खेळीचे कौतुक केले. काही चाहत्यांनी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जला विनंती केली की त्यांनी एलेक्सचा संघात समावेश करून घ्यावा. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Mea1eW
No comments:
Post a Comment