Ads

Monday, January 18, 2021

मुंबई क्रिकेट संघाला मोठा झटका; विजेतेपदाचे दावेदार होते, पण...

मुंबई: करोना व्हायरसनंतर देशात सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट स्पर्धेत एका धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. १० जानेवारीपासून टी-२० स्पर्धेला सुरूवात झाली होती. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये मुंबई संघाचा समावेश होता. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे होते तर अन्य दिग्गज खेळाडूंचा भरना या संघात होता. वाचा- मुंबई संघात अनेक दिग्गज खेळाडू होते. पण स्पर्धेत त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मुंबई संघाने साखळी फेरीतील पाच पैकी चार लढती गमावल्या त्यामुळे ते स्पर्धेबाहेर झाले आहेत. रविवारी मुंबईची लढत पुडुचेरीविरुद्ध झाली. या लढतीत मुंबई सहज विजय मिळवेल असे वाटत होते. पण पुडुचेरी संघाने मुंबईचा दारूण पराभव केला. या पराभवासह मुंबई क्वालीफायर्सच्या स्पर्धेतून बाहेर पडले. वाचा- स्पर्धेत मुंबईचा समावेश इ ग्रुपमध्ये होता. घरच्या मैदानावर घेणाऱ्या मुंबईला पहिल्या लढतीत दिल्लीकडून ७६ धावांनी, दुसऱ्या लढतीत केरळकडून, तिसऱ्या लढतीत हरियाणाकडून ८ विकेटनी पराभव स्विकारावा लागला. पहिल्या तीन लढतीनंतर देखील मुंबईला क्वालीफायर्समध्ये पोहोचण्याची संधी होती. पण रविवारी पुड्डचेरीने त्यांचा ६ विकेटनी पराभव केला. या पराभवासह ते स्पर्धेबाहेर झाले आहेत. वाचा- मुंबई संघाची अखेरची लढत आंध्र प्रदेशविरुद्ध होणार आहे. आंध्रने देखील मुंबई प्रमाणेच पहिल्या चार लढती गमावल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qAayqp

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...