Ads

Tuesday, January 19, 2021

IND vs AUS : विजयासह भारतीय संघाने साधली हॅट्ट्रिक, असा घडवला इतिहास...

ब्रिस्बेन, : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात धमाकेदार विजय मिळवला. रिषभ पंतने चौकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण या विजयासह भारतीय संघाने एक हॅट्रिकही साधली आहे. भारतीय संघाने हा इतिहास नेमका कसा रचला आहे, पाहा.... यापूर्वी बोर्डर-गावस्कर ट्रॉफी भारतामध्ये २०१८-१९ साली खेळवण्यात आली होती. ही चार कसोटी सामन्यांची मालिका होती. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला होता. त्यापूर्वी म्हणजेच २०१६-१७ साली ऑस्ट्रेलियामध्ये बोर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे भारतासाठी ही बोर्डर-गावस्कर ट्रॉफीची हॅट्रीक ठरली आहे. कारण भारताने २०१६-१७ साली बोर्डर-गावस्कर ट्रॉफी पहिल्यांदा जिंकली होती. त्यानंतर भारतामध्ये २०१८-१९ साली भारतामध्ये बोर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती आणि ती भारताने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग तीन मालिका भारताला यापर्वी कधीच जिंकता आल्या नव्हत्या. कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत चांगलीच चुरस रंगली होती. भारतीय संघाचे सर्वात जास्त गुण असले तरी विजयाच्या टक्केवारीमुळे त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते, तर ऑस्ट्रेलियाचा संघ हा अव्लल स्थानावर होता. पण या विजयानंतर भारतीय संघ या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठराविक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत असले तरी पंतने अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे. भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहोचला तरी कसा, पाहा...या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही ७३.८ एवढी होती, तर भारताची ७०.२ एवढी होती. न्यूझीलंडचा संघ यावेळी ७० टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर होता. पण भारतीय संघाने ब्रिस्बेनमध्ये विजय मिळवला आणि मालिका २-१ अशी जिंकली. त्यामुळे भारताच्या विजयाची टक्केवारी ७१.६ एवढी झाली असून त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. पण पराभवानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघाची चांगलीच घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहेच, पण त्यांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. कारण या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची विजयीच टक्केवारी ही ६९.२ एवढी झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंड आता दुसऱ्या स्थानावर ७० टक्क्यांसह असून ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35T2Dwy

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...