Ads

Tuesday, January 19, 2021

IND vs AUS : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने करून दाखवलं, धोनी-कोहली यांनाही सोडलं मागे

ब्रिस्बेन, : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत धुळ चारली. भारताचा जवळपास संपूर्ण संघच दुखापतग्रस्त झाला होता. पण अजिंक्य डगमगला नाही. युवा खेळाडूंना साथीला घेऊन त्याने संघाची मोट बांधली आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अजिंक्यने हा विजय मिळवून देताना महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनाही मागे सोडल्याचे पाहायला मिळत आहे. २०१६-१७ साली ऑस्ट्रेलियामध्ये बोर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला होता. पण त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या संघात बरेच नवीन चेहरे होते आणि त्यांनी भारताला कडवी झुंज दिली होती. पण या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली फक्त एकच सामना खेळला आणि त्यामध्येच भारतीय संघ पराभूत झाला होता. पण त्यानंतर जेव्हा अजिंक्यकडे कर्णधारपद आले तेव्हा मात्र भारताने एकही सामना गमावला नाही. महेंद्रसिंग धोनी हा भारताचा यशस्वी कर्णधार असल्याचे म्हटले जाते. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मातीत धोनीलाही जी कामगिरी करता आली नाही ती यावेळी अजिंक्यने करून दाखवली आहे. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारताने तीन कसोटी सामन्यांमध्ये दोन विजय मिळवले, तर एक अनिर्णीत राखली. त्यामुळे धोनी आणि कोहली या दोन्ही कर्णधारांपेक्षा अजिंक्यची टक्केवारी नक्कीच जास्त आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात धमाकेदार विजय मिळवला. रिषभ पंतने चौकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण या विजयासह भारतीय संघाने एक हॅट्रिकही साधली आहे. यापूर्वी बोर्डर-गावस्कर ट्रॉफी भारतामध्ये २०१८-१९ साली खेळवण्यात आली होती. ही चार कसोटी सामन्यांची मालिका होती. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला होता. त्यापूर्वी म्हणजेच २०१६-१७ साली ऑस्ट्रेलियामध्ये बोर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे भारतासाठी ही बोर्डर-गावस्कर ट्रॉफीची हॅट्रीक ठरली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36aJrKT

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...