ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत जेव्हा ऋषभ पंत बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ६ बाद १८६ अशी होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३६९ धावांच्या तुलनेत भारत खुपच मागे होता. त्यानंतर शार्दुल ठाकूर आणि () या दोघांनी शानदार भागिदारी केली. सातव्या विकेटसाठी केलेल्या १२३ धावांच्या भागिदारीमुळे भारताला ३००च्या पुढे धावा करता आल्या. वाचा- शार्दुल ठाकूर सोबत १२३ची भागिदारी करताना सुंदरने १४४ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ६२ धावा केल्या. सुंदरचे हे शानदार पदार्पण ठरले. त्याने गोलंदाजीत ३ विकेट घेतल्या तर फलंदाजीत अर्धशतक झळकावले. या खेळीत सुंदरच्या नावावर काही विक्रम झाले आहेत. वाचा- वाचा- > ऑस्ट्रेलियात कोणत्याही परदेशी संघाकडून सातव्या क्रमांकाच्या फलंदाजाकडून करण्यात आलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सुंदरने ६२ धावा केल्या असून हा विक्रम आता सुंदरच्या नावावर झाला आहे. > भारताकडून सातव्या क्रमांकावर पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सुंदरचा समावेश झाला आहे. या यादीत राहुल द्रविड पहिल्या स्थानावर असून त्याने १९९६ साली लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध ९५ धावा केल्या होत्या. तर बापू नाडकर्णी यांनी १९५५ साली न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ६८ धावा केल्या होत्या. सुंदर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वाचा- > सुंदरने पदार्पणात ३ विकेट आणि अर्धशतक अशी कामगिरी केली. असे करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय. याआधी १९४७ साली दत्त पडकर यांनी सिडनीत ५१ धावा केल्या होत्या आणि १४ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bOkt7w
No comments:
Post a Comment