नवी दिल्ली: भारतीय संघातील जलद गोलंदाज () याला आज मुलगी झाली. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तो कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसऱ्या लढतीत उमेश यादव जखमी झाला होता. दुखापतीमुळे उमेश उर्वरित दोन कसोटी मालिका खेळू शकणार नाही. तो भारतात परतला असून बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेसवर काम करणार आहे. वाचा- उमेश यादवने काही मिनिटांपूर्वी सोशल मीडियावरून मुलगी झाल्याची गोड बातमी सर्वांना सांगितली. वाचा- वाचा- दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात उमेश यादवला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. उमेश दुसऱ्या डावात फक्त ३.३ षटकेच गोलंदाजी करू शकला होता. उमेश जेव्हा चौथा चेंडू टाकायला गेला तेव्हा त्याला स्नायूंमध्ये दुखत असल्याचे जाणवले. उमेशची दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची होती की, त्यानंतर उमेशला मैदान सोडावे लागले. यानंतर उमेशला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर बीसीसीआयने तो पुढील दोन कसोटी सामने खेळू शकणार नाही असे जाहीर केले. उमेश यादवच्या जागी भारतीय संघात युवा गोलंदाज टी नटराजन याला संधी देण्यात आली आहे. वाचा- उमेशला २०२१ सालच्या पहिल्याच दिवशी मुलगी झाली आहे. ही गोड बातमी त्याने सोशल मीडियावरुन सर्वांनी दिली. उमेशला त्याचे संघातील अन्य सहकारी आणि क्रिकेट चाहते शुभेच्छा देत आहेत. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hAwbDO
No comments:
Post a Comment