![](https://maharashtratimes.com/photo/80058820/photo-80058820.jpg)
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ( )चा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला दुखपत झाली होती. तो पुढील दोन्ही सामने खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने जाहीर केले होते. तेव्हा पासून यादवच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याची चर्चा सुरू होती. जलद गोलंदाजी म्हणून टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर या दोघांचे नाव आघाडीवर होते. वाचा- वाचा- बॉक्सिंग डे कसोटीत उमेश यादवला दुखापत झाली होती. त्यामुळे तो उर्वरीत कसोटी मालिकेला मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्य़ातील कसोटी मालिका सुरू झाल्यानंतर भारतीय संघाला बसलेला हा दुसरा मोठा झटका आहे. त्याआधी पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो संघाबाहेर झाला. आणि मोहम्मद शमी हे दोन्ही खेळाडू बेंगळुरू येतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे फिटनेसवर काम करणार आहेत, असे बीसीसीआयने म्हटले आहे. वाचा- टी नटराजनने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिकेतील तिसऱ्या लढतीत त्याला पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतरच्या टी-२० मालिकेत देखील त्याने शानदार गोलंदाजी केली होती. भारतीय संघाने वनडे मालिकेतील पहिल्या दोन लढती गमावल्या होत्या. अखेरच्या लढतीत नवदीप सैनीला दुखापत झाल्याने नटराजनला संघात जागा मिळाली. त्याने मार्नस लाबुशेनची विकेट घेत दमदार पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या. नंतर टी-२० मालिकेत ३ लढतीत त्याने सर्वाधिक ६ विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधले. वाचा- आता उमेश यादवच्या दुखापतीमुळे संघात स्थान मिळवणाऱ्या टी नटराजनला अंतिम ११ जणांमध्ये खेळण्याची संधी मिळते का हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38LWMJW
No comments:
Post a Comment