Ads

Friday, January 1, 2021

तो खुप चतुर आहे, आम्ही अश्विनच्या जाळ्यात फसलो; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची कबूली

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा ३६ धावसंख्येवर ऑल आउट झाला असला तरी ती एक घटना वगळता भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर मेलबर्नवर टीम इंडियाने शानदार विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. वाचा- भारतीय गोलंदाजांनी दोन कसोटीतील ४ डावात मिळून ऑस्ट्रेलिचा ३ वेळा ऑल आउट केला. या तिनही डावात ऑस्ट्रेलियाला फक्त एकदा २०० धावा करता आल्या. भारताने पहिल्या कसोटीत १९१, दुसऱ्या कसोटीत १९५ आणि २०० धावांवर ऑल आउट केला. वाचा- भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला ५० धावा करू दिल्या नाही. ऑस्ट्रेलियाचा स्टार कसोटीपटू स्टीव्ह स्मिथ चार डावात फक्त १० धावा करू शकला. ऑस्ट्रेलयाच्या फलंदाजांच्या या अपयशावर बोलाना म्हणाला, आम्ही आर अश्विनच्या जाळ्यात फसलो. मी याआधी कधीच त्याची गोलंदाजी खेळली नव्हती. तो एक महान गोलंदाज आहे. पण त्याच्या शिवाय तो एक चतुर गोलंदाज देखील आहे. त्यासाठी कोणत्याही आकडेवारीची गरज नाही. अश्विनने दोन कसोटीत १० विकेट घेतल्या आहेत. त्यापैकी स्मिथला दोन वेळा तर लाबुशेनला एकदा बाद केले आहे. खरच तयारी करून आला आहे. आम्ही त्याच्या जाळ्यात अनेक वेळा अडकतोय. भारताने खुप चांगली गोलंदाजी केली. मग ती फिरकी असो की जलद गोलंदाजी, असे लाबुशेन म्हणाला. वाचा- भारतीय गोलंदाजांचे कौतुक करताना त्याने आतापर्यंत अपयशी ठरलेल्या स्टीव्ह स्मिथचा बचाव केला. तुम्ही काहीही म्हणा पण काही दिवसांपूर्वी त्याने भारताविरुद्ध वनडेत मोठी शतकी खेळी केली होती. त्याने मर्यादित षटकांचे सामने अधिक खेळले आहेत. कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. क्रिकेट आणि करोना काळातील हे सत्य आहे. वाचा- स्मिथची कसोटीमधील सरासरी ६०पेक्षा अधिक आहे. करिअरच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याला वेगाने धावा करण्यास आवडतात, असे लाबुशेन म्हणाला. वाचा- दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने फ्लिडिंग लावून धावा करण्याची संधी कमी दिली. भारतीय संघ पूर्ण योजनेने उतरला होता आणि त्याची अमंलबजावणी चोख केली. लेग साइडला धावा करणे अवघड होते. त्याच बरोबर आमची फिल्डिंग देखील चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत ८ कॅच सोडले. ज्यातील दोन कॅच लाबुशेनने कडून सुटले होते. आम्ही फ्लिडिंग पोझिशनवर मेहनत घेत आहोत. ही एकाग्रतेची गोष्टी असल्याचे त्याने सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38Qixsb

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...