नवी दिल्ली: chennai test इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली () आणि टीम इंडिया ( )वर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी कर्णधार बदलण्यासंदर्भात पोस्ट केल्या आहेत. संघात कुलदीप यादवला न घेण्याच्या निर्णयापासून ते विराटच्या अनेक निर्णयावर टीका होत असताना जमैकाच्या धावपटू योहान ब्लेक ( )ने मात्र भारतीय संघ, विराट कोहली आणि अन्य खेळाडूंचे कौतूक केले आहे. वाचा- योहान ब्लेकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्याने प्रथम इंग्लंडच्या संघाचे आणि खेळाडूंचे कौतुक केले. पण त्यानंतर ब्लेकने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले. भारतीय संघाने चांगली कामगिरी केली नाही. पराभवानंतर विराटने कोणतेही एस्कुज दिले नाही आणि जबाबदारी स्वत:वर घेतली. भारतीय संघाबाबत मला हीच गोष्ट फार आवडते. पराभवासाठी विराट कोहली कोणतेही कारण शोधत नाही. त्याच्या नेतृत्वाची हीच गोष्ट मला आवडते. तो प्रत्येक गोष्टीचा दोष स्वत:वर घेतो. वाचा- विराट म्हणाला की, गोलंदाजांनी योग्य लाइन आणि लेंथने गोलंदाजी केली नाही आणि फलंदाजांनी सातत्याने कामगिरी केली नाही. पण आम्ही ड्रेसिंग रूममध्ये जाऊ विश्लेषण करू आणि पुन्हा परत येऊ. मला विराटची ही गोष्ट आवडली. कसोटी क्रिकेट त्याच्या सर्वोत्तम स्तरावर आहे. दुसरी कसोटी देखील रोमांचक झाली पाहिजे. ऑस्ट्रेलियात भारत ०-१ने पिछाडीवर होते आणि आता घरच्या मैदानावर ते ०-१ने पिछाडीवर होते. मी दुसऱ्या कसोटीबाबत उत्सुक आहे. वाचा- ब्लेकने दोन वेळा ऑलिपिंक सुवर्णपदक मिळवले आहे. व्हिडिओत त्याने सांगितले की मी क्रिकेटचा चाहता आहे. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांचे त्याने कौतुक केले. गिल शानदार फलंदाज आहे आणि पंत देखील उत्तम फलंदाज आहे. तो प्रत्येक सामन्यात धावा करणार नाही पण कसोटी क्रिकेटसाठी तो चांगला फलंदाज आहे. यामुळेच मला कसोटी क्रिकेट आवडते. हे तुमची मानसिकरित्या परीक्षा घेते. पुजाराने ऑस्ट्रेलियात जशी कामगिरी केली होती, तशीच कामगिरी पाहायला मला आवडते. वाचा- ... ब्लेकने इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स एडरसनने कौतुक केले. त्याने पहिल्या कसोटीत पाच विकेट घेतल्या. वाढणाऱ्या वयासोबत तो सर्वोत्तम कामगिरी करत आहे. वय ही फक्त एक संख्या आहे, हेच तो दाखवत आहे असे ब्लेक म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3q8A5XU
No comments:
Post a Comment