चेन्नई, : गुरुवारी झालेल्या आयपीएलच्या लिलावात ख्रिस मॉरिसला सर्वाधिक १६.२५ कोटी रुपयांना राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात दाखल केले. आयपीएलमध्ये यापूर्वी १६ कोटी रुपयांना युवराज सिंगला एका संघाने आपल्या ताफ्यात दाखल केले होते. त्यामुळे आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक किंमत ही ख्रिस मॉरिसला मिळाल्याचे म्हटला जात होते. पण आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू हा मॉरिस ठरलेला नाही. तर आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा एक भारतीय खेळाडू ठरल्याचे आता पुढे आले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात मॉरिस हा दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. कारण आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात सर्वाधिक किंमत ही विराट कोहलीला मिळते. विराट हा आरसीबीचा कर्णधार आहे आणि त्याला संघात कायम ठेवण्याकरता आरसीबीचा संघ कोहलीला प्रत्येक हंगामासाठी १७ कोटी रुपये देत असल्याचे आता समोर आले आहे. आयपीएलचा ढाचा २०१८ साली झालेल्या मेगा लिलावाच्यावेळी बदलण्यात आला होता. त्यावेळी तीन खेळाडू कोणतेही संघ कायम ठेवून शकतात, असा नियम होता. त्यावेळी पहिल्या खेळाडूला संघात कायम ठेवण्यासाठी १५ कोटी एवढी रक्कम ठरवण्यात आली होती. त्याचबरोबर दुसऱ्या खेळाडूला संघात ठेवायचे असेल तर ११ आणि तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी एवढी रक्कम ठेवण्यात आली होती. त्यावेळी आरसीबीने यामध्ये थोडा बदल केला होता. आरसीबीच्या संघाने कोहलीला १७ कोटी दिले होते, त्यानंतर एबी डिव्हिलियर्सला ११ कोटी दिले होते. पण तिसरा खेळाडू सर्फराझ खान याला संघात कायम ठेवण्यासाठी फक्त १.७५ कोटी रुपये त्यांनी खर्च केले होते. त्यामुळे २०१८ सालापासून कोहलीला दरवर्षी आरसीबीकडून आयपीएल खेळण्यासाठी १७ कोटी रुपये मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएलचा मेगा लिलाव आता पुढच्यावर्षी होणार आहे. त्यावेळी आयपीएलच्या ढाच्यामध्ये अजून बदल करण्यात येणार आहे. त्यावेळी कोणत्या खेळाडूला संघात कायम ठेवण्यासाठी कोण किती रक्कम मोजतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पण यासाठी आता आयपीएलच्या पुढच्या लिलावाची वाट पाहावी लागणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bjFghn
No comments:
Post a Comment