Ads

Friday, February 19, 2021

सिडनी कसोटीतील भारताच्या हिरोला IPL लिलावात वाटाण्याच्या अक्षता; दिली ही प्रतिक्रिया

चेन्नई: एका महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत कसोटीत मास्टरक्लास दाखवणाऱ्या भारताचा फलंदाज ()ला आयपीएल लिलावात () मोठा सेटबॅक बसला. सलग दुसऱ्या वर्षी विहारीला कोणत्याही संघाने बोली लावली नाही. विराहीने लिलावासाठी स्वत:ची बेस प्राइस १ कोटी निश्चित केले होती. वाचा- लिलावात भारतीय खेळाडूंकडून लावण्यात आलेल्या सर्वात जास्त बेस प्राइसमध्ये हनुमा विहारीचा समावेश होता. अर्थात भारतीय संघाकडून फक्त कसोटी खेळणाऱ्या खेळाडूला लिलावात खरेदी न करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी चेतेश्वर पुजाराबाबत असे झाले होते. पुजारा २०१४च्या आयपीएलमध्ये खेळला होता. पण त्यानंतर त्याला कोणी विकत घेतले नाही. या वर्षी मात्र पुजाराला ५० लाख या बेस पाइसला चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले. वाचा- विहारी २०१९च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. पण दोन सामन्यात त्याला फक्त ४ धावा करता आल्या. दिल्लीने त्याला रिलीझ केल्यानंतर २०२० आणि २०२१ मध्ये त्याचा संघ मिळाला नाही. दिल्लीच्या आधी विहारी २०१३ आणि २०१५ मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळला होता. तेव्हा देखील त्याला फार चांगली कामगिरी करता आली नव्हती. २४ आयपीएल सामन्यात विहारीने २८४ धावा केल्या आहेत. वाचा- आयपीएल लिलावात कोणीच विकत न घेतल्यानंतर विहारीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने LOL असे लिहीत हसणारी इमोजी शेअर केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत झालेल्या कसोटीत जखमी असताना देखील विहारी मैदानावर थांबला होता. त्याने अश्विन सोबत केलेल्या नाबाद भागिदारीमुळे टीम इंडियाला सामना ड्रॉ करता आला. नंतर भारतीय संघाने अखेरच्या कसोटीत विजय मिळवत मालिका २-१ने जिंकली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NG7aMw

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...