नवी दिल्ली: क्रिकेट विश्वात युनिव्हर्स बॉस अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलने अचानक पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून माघर घेतली आणि स्वत:चे देश गाठले. गेल्या आठ वर्षापासून राष्ट्रीय संघातून बाहेर असलेला गेल विविध लीग स्पर्धातून खेळताना दिसतो. आता पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सोडून तो मयादेशात परतला आहे. त्याच्या परतण्याचे कारण ऐकूण तुम्हाला देखील अभिमान वाटेल. वाचा- श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी सलामीवीर ख्रिस गेलची संघात निवड केली गेली. ४१ वर्षीय गेलला दोन वर्षानंतर संधी दिली गेली आहे. दोन आठवड्यांनी श्रीलंकेविरुद्ध वेस्ट इंडिजला ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. वाचा- वेस्ट इंडिजचे मुख्य निवड समिती प्रमुख रॉजर हार्पर म्हणाले, गेलने गेल्या काही स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे आणि निवड समितीच्या मते त्याचा संघात समावेश केल्याने फायदा होईल. वाचा- गेलने ऑगस्ट २०१९ साली वेस्ट इंडिजकडून अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. तेव्हा तो भारताविरुद्ध खेळला होता. आता भारतात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने वेस्ट इंडिजच्या निवड समितीने त्याचा संघात समावेश केल्याचे दिसते. वाचा- १९९९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर गेलने आतापर्यंत १०३ कसोटी, ३०१ वनडे आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. या शिवाय टी-२०मध्ये सर्वाधिक १ हजारहून अधिक षटकार मारणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. गेलने वेस्ट इंडिजकडून खेळताना टी-२०मध्ये ५८ सामन्यात १ हजार ६२७ धावा केल्या आहेत. ११७ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. १४२.८४ इतका त्याचा स्ट्राइक रेट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध लीग स्पर्धा गाजवणाऱ्या गेलच्या फलंदाजीचा उपयोग अन्य संघांना होताना दिसत होते. पण आता गेलच्या या फलंदाजीचा वापर राष्ट्रीय निवड समितीने करून घेण्याचे ठरवल्याचे दिसते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37OUBWg
No comments:
Post a Comment