अहमदाबाद: मोटेरा या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून ( ) केल्याने सोशल मीडिवर दोन गट पडले आहेत. अनेकांनी याला विरोध केला आहे. तर भाजपचे नेते आणि समर्थक त्याला पाठिंबा देत आहेत. वाचा- गुजरात क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयावर अनेक जण आक्षेप घेत आहेत. अनेकांनी तर सरदार पटेल यांचे नाव बदलल्यावरून भाजपवर टीका केली आहे. पण सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स या ६३ एकर परिसरात पसरलेल्या कॉम्पलेक्समधील मोरेटा या क्रिकेट मैदानाचे नाव नरेंद्र मोदी असे करण्यात आले. वाचा- मोदीचे नाव स्टेडियमला देण्यावरून विरोध प्रामुख्याने काँग्रेसचे नेते आणि समर्थक आहेत. पण देशातील एखाद्या स्टेडियमला राजकीय नेत्याचे किंवा पंतप्रधानांचे नाव देण्याची ही पहिली वेळ नाही. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने ९ स्टेडियम आहेत. ही स्टेडियम नवी दिल्ली, कोच्ची, चेन्नई, इंदूर, गुवाहाटी, मडगाव, पुणे आणि गाझियाबाद येथे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर इंदिरा गांधी यांच्या नावाने गुवाहाटी, नवी दिल्ली, विजयवाडा येथे राजीव गांधी यांच्या नावाने हैदराबाद, डेहराडून, कोच्ची आणि विशाखापट्टनम येथे स्टेडियम आहेत. फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती, कबड्डी अशा अनेक खेळाची ही स्टेडियम आहेत. वाचा- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने हिमाचल प्रदेशमधील नादोन येथे क्रिकेट स्टेडियम आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावाने वलसाड येथे आणि अहमदाबाद येथे स्टोटर्स कॉम्पेक्स आहे. दिल्लीतील कोटला स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली असे केले गेले. केरळमधील कोईकोड येथील मैदानाचे नाव राज्याचे पहिले मुख्यमंत्री ईएमएस नंबूद्रिपाद असे केले गेले आहे. वाचा- प्रशासकांची नावे स्टेडियमला फक्त राजकीय नेत्यांची नावे नाही तर क्रीडा क्षेत्रातील प्रशासकांची देखील नावे स्टेडियमला देण्यात आली आहेत. यात चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम, मोहालीचे आयएस बिंद्रा, मुंबईचे वानखेडे, बेंगळुरूचे एम चिन्नास्वामी ही त्याची उदाहरणे आहेत. याशिवाय प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका याचे नाव एका मैदानाला दिले आहे. तर दिल्लीतील संगीतकार त्यागराजा यांच्या नावाने स्टेडियम आहे. इंग्रजी नावे असलेली मैदाने मुंबईत ब्रेबोर्न स्टेडियम हे नाव गव्हर्नर लॉर्ड ब्रेबोर्न यांच्या नावाने दिले आहे. तर कोलकातामधील इडन गार्डन्स हे नाव भारताचे माजी गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलँड यांची बहिणी एमिली आणि फेनी इडन यांच्या नावाने दिले आहे. जमशेदपूर येथील कीनन स्टेडियम हे टाटा स्टीलचे माजी जनरल मॅनेजर जॉन लॉरेंस कीनन यांच्या नावाने ठेवले आहे. या क्रिकेटपटूंच्या नावने स्टॅड आहे पण स्टेडियम नाही सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव यांच्या नावाने दिल्ली, मुंबईसह अनेक स्टेडियमवर स्टॅड आहेत. हॉकीत देखील अशा प्रकारे खेळाडूंची नावे देण्यात आली आहेत. इंदूरमध्ये एका स्टेडियमला महाराणी उषाराजे ट्रस्ट क्रिकेट ग्राउड आहे. तेथे आधी होळकर क्रिकेट टीम देखील होती. २०१० साली त्याचे नाव होळकर स्टेडियम असे केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZIIANE
No comments:
Post a Comment