अहमदाबाद, : अहमदाबाद येथील स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आणि त्यानंतर देशभरात एकच गदारोळ झाला होता. बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर याबाबत चांगल्या प्रतिक्रीया दिल्या नव्हत्या. त्यानंतर सामना पाहत असताना काही जणांना एक प्रश्न पडला. हा प्रश्न म्हणजे जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी खेळाडू सज्ज होतो, तेव्हा तिथे रिलायन्स आणि अदानी एण्ड असे पाहायला मिळते. त्यामुळे ही नावं आली तरी कशी, पाहा फॅक्ट चेक.... टाइम्स नाऊ या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी यावेळी याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितले की, " हे स्टेडियम बांधण्यासाठी भरपूर पैसे लागले. त्यावेळी रिलायन्स आणि अदानी या दोन्ही कंपन्यांनी स्टेडियमबांधणीसाठी मोठे डोनेशन दिले आहे. त्याचबरोबर या दोन्ही कंपन्यांनी या स्टेडियममधील प्रत्येकी एक कॉर्पोरेट बॉक्सही विकत घेतला आहे. या एका बॉक्सची किंमत २५० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्यांनी स्टेडियमच्या बांधणीसाठी मोठा हातभार लावला त्यांना या स्टेडियममधील गोलंदाजी एण्ड्सची नावे देण्यात आली आहेत." पण अदानी हे नाव यापूर्वीपासून या स्टेडियममध्ये होते, असेही म्हटले जाते. कारण जेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हापासून या मैदानात अदानी हे नाव आहे. कारण अदानी ही कंपनी यापूर्वीपासून मैदानाच्या काही खर्चासाठी आपले योगदान देत होती. पण रिलायन्सने या मैदानाचे जेव्हा रुप बदलण्यात आले तेव्हा मदत केली होती. त्यामुळे सध्याच्या घडीला या मैदानातीन गोलंदाजांच्या एण्डला अंबानी आणि अदानी यांची नावे देण्यात आली आहेत. अहमदाबाद येथे तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या स्टेडियमचे अचानक नामांतर करण्यात आले आणि नरेंद्र मोदी क्रिकेट स्डेटियम, असे नाव देण्यात आले. हे स्टेडियम मोठ्या परिसरामध्ये आहे. संपूर्ण परिसराचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असे करण्यात आले होते. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या कॉम्पलेक्समधील क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे. मोटेरा क्रिकेट स्टेडियम आता या नावाने ओळखले जाणार आहे. पण जेव्हा हा उद्घाटन सोहळा झाला तेव्हा या नामकरणावर जोरदार टीका करण्यात आली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kmbpJj
No comments:
Post a Comment