कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये येत्या २-३ महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पार्टीने (भाजपा) एक मोठी खेळी खेळल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भाजपाने या निडणुकींपूर्वी भारताच्या एका माजी क्रिकेटपटूला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. काल भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाने दुसऱ्याच दिवशी हे पाऊच उचलले आहे. भाजपाने भारताचा माजी क्रिकेटपटू अशोक दिंडाला आपल्या पार्टीत सामील करुन घेतले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि भाजपाचे राज्याचे उपाध्यक्ष अर्जुन सिंग यांच्या उपस्थितीत दिंडा भाजपामध्ये आज प्रवेश झाला आहे. काही दिवसांपूर्वीच दिंडाने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून आपील निवृत्ती जाहीर केली होती. दिंडाने भारताकडून १३ एकदिवसीय, ९ ट्वेन्टी-२० सामने खेळले होते. दिंडाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२ आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १७ विकेट्स मिळडवल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांसाठी निवडणुक होणार आहे. या निवडणुका ३० मे पूर्वी होतील, असेही म्हटले जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मनोज तिवारीने बुधवारी प्रवेश केला. भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केलेल्या मनोजने आता राजकीय मैदानावर खेळण्याचे ठरवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्याला पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मनोजने भारताकडून १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मनोजने सोशल मीडियावरून याची घोषणा केली. आजपासून एक नवा प्रवास सुरू करत आहे. तुमचे प्रेम आणि पाठिंब्याची गरज आहे असे मनोजने म्हटले आहे. याच बरोबर त्याने इंस्टाग्रामवर नवे अकाउंट देखील सुरू केले आहे. हावडा येथे जन्मलेल्या मनोज तिवारीने २००८ साली भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. जुलै २०१५ मध्ये त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. १२ वनडे आणि ३ टी-२० मिळून त्याने २८७ धावा केल्या आहेत. मनोज तिवारीच्या आधी माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्लाने बंगाल निवडणुकीत तृणमूलकडून निवडणूक लढवली होती. शुक्लाने २०१६ साली निवडणूक लढवली होती. तो राज्य सरकारमध्ये क्रीडा मंत्री होता. पाच जानेवारी रोजी त्याने राजीनामा दिला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qVCZiS
No comments:
Post a Comment