अहमदाबाद : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा दुसऱ्या दिवशी पराभव झाल्यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पिचवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या मते कसोटी क्रिकेटसाठी उपयुक्त आहे की नाही हे खेळाडू नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ठरवेल. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पिचवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण अहमदाबाद येथे झालेल्या कसोटीचा निकाल फक्त दुसऱ्या दिवशी लागल्याने पिच कसोटी सामन्यासाठी योग्य नव्हेत असे अनके दिग्गज खेळाडू म्हणत आहेत. भारताचे माजी महान फलंदाज सुनिल गावस्कर यांनी मात्र पिचला दोष देण्यास नकार दिला. त्यांच्या मते याच खेळपट्टीवर रोहित शर्मा आणि जॅक क्रॉउली यांनी अर्धशतक केली. इंग्लंडचे फलंदाज धावा करण्या ऐवजी विकेट वाचवण्याचा विचार करत होते. अक्षर आणि अश्विन यांनी शानदार गोलंदाजी केल्याचे ते म्हणाले. वाचा- आयसीसीचा नियम काय आयसीसीच्या नियमानुसार ज्या खेळपट्टीवर बॅट आणि बॉल यांच्यात मुकाबला होत नाही ती खेळपट्टी खराब ठरवली जाते. अशा खेळपट्टीवर एक तर फलंदाजांना अधिक मदत मिळते आणि गोलंदाजांना काहीच मदत मिळत नाही. गोलंदाज मग जलद असो की फिरकीपटू. या उटल पिचवर गोलंदाजांना अधिक फायदा होत असेल आणि फलंदाजांना धावाच करता येत नसतील तर संबंधित पिच खराब ठरवले जाते. पिचला खराब तेव्हाच ठरवले जाते जेव्हा फिरकीपटूंना अति मदत मिळते. विशेषत: सामन्याच्या सुरुवातीच्या दिवसात. पण आशिया खंडातील पिचसाठी हा नियम थोडा सौम्य करण्यात आला आहे. वाचा- सामना जर भारत, श्रीलंका, पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये होत असेल तर फिरकीपटूंना मदत मिळणे ग्रृहीत धरले जाते. आयसीसीच्या नियमानुसार पिचवरील अतिरिक्त उसळी अमान्य केली जाते. सामना जस जसा पुढे जाईल तस तसे फिरकीपटूंना मदत मिळते आणि चेंडूला अतिरिक्त उसळी मिळू शकते. असे सर्व झाले तरी पिचला खराब ठरले जात नाही. अहमदाबाद मैदानावर ३० पैकी २८ विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. पिचमधून फिरकिपटूंना मदत मिळत होती. म्हणूनच इंग्लंडचा पार्ट टाइम फिरकीपटू जो रूटला पाच विकेट मिळाल्या. आयसीसीने २०१८ नंतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय पिचला खराब ठरवले नाही. आयसीसीने दक्षिण आफ्रिकेतील वॉडरर्स पिचला खराब ठरवले होते. भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ६३ धावांनी विजय मिळवला होता. सामन्यात २९६ षटक झाली होती. ज्यात ८०५ धावा झाल्या आणि ४० विकेट पडल्या. पण त्या सामन्यात पिचवरील अतिरिक्त उसळीमुळे दोन्ही संघातील काही खेळाडू जखमी देखील झाले होते. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या हेल्मेटला चेंडू लागला तेव्हा अंपायरने सामना थांबवला होता. कारण त्यांना वाटले की यापुढे सामना सुरू ठेवणे धोक्याचे ठरले. वाचा- २०१७ साली पुण्यातील पिच आयसीसीने खराब ठरवले होते. तेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत झाली होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६० तर दुसऱ्या डावात २८५ धावा केल्या होत्या. भारतला पहिल्या डावात १०५ तर दुसऱ्या डावात १०७ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू स्टीव्ह ओ किफेने १२ विकेट घेतल्या होत्या. विशेष म्हणजे या सामन्यात भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवने चार विकेट घेतल्या होत्या. सामन्यात भारताचा ३३३ धावांनी पराभव झाला होता. खराब पिच दिल्यावर काय होते एखाद्या पिचला खराब दिल्यावर त्याला तीन नकारात्मक गुण दिले जातात. ज्या पिचना खराब आणि अनफिट ठरवले जाते त्या मैदानावर १२ महिने कोणताही आंतरराष्ट्रीय मॅच होत नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kqXpOj
No comments:
Post a Comment