चेन्नई: auction चेन्नईत आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी लिलावाला सुरूवात झाली आहे. लिलावाच्या पहिल्या फेरीत अपेक्षेप्रमाणे काही खेळाडूंना कोणत्याही संघांना विकत घेण्यास रस दाखवला नाही. यात चेन्नई सुपर किंग्जने रिलीझ केलेल्या केदार जाधवचा समावेश आहे. वाचा- आयपीएलच्या गेल्या हंगामात केदारची कामगिरी खराब झाली होती. ८ सामन्यात त्याने फक्त ६२ धावा केल्या होत्या. २६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. २०१९मध्ये देखील केदारने १४ सामन्यात फक्त १६२ धावा केल्या होत्या. फक्त खराब फॉर्म नव्हे तर केदारची बेस प्राइस देखील त्याच्या विरुद्ध जाऊ शकते. त्याने स्वत:ची प्राइस २ कोटी इतकी ठेवली आहे. वाचा- केदार जाधवसह करुन नायर, हनुमा विहारी या भारतीय खेळाडूंना अद्याप कोणी विकत घेतले नाही. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला विकत घेण्यासाठी चेन्नई आणि बेंगळुरू संघात जोरदार चुरस होती. अखेर बेंगळूरूने दोन कोटी बेस प्राइस असलेल्या या खेळाडूला १४ कोटी २५ लाखांना विकत घेतले. त्या शिवाय शाकिब अल हसनला कोलकाता नाइट रायडर्सने ३ कोटी २० लाख तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथला २ कोटी २० लाखांना दिल्ली संघाने विकत घेतले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dobbQh
No comments:
Post a Comment