चेन्नई : आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी आज लिलाव होणार आहे. आयपीएल लिलावाच्या काही तास आधी मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू ()ने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. वाचा- भारतीय संघात येण्याआधी हार्दिक प्रथम चमकला तो आयपीएलमध्ये, त्यानंतर हार्दिक टीम इंडियाचा सुपरस्टार झाला. हार्दिकचे बालपण गरिबीमध्ये गेले. पण त्याने स्वप्नाचा पाठलाग करणे सोडले नाही. ही स्वप्न पूर्ण करण्यात या संघाचा मोठे योगदान होते. वाचा- व्हिडिओ शेअर करताना हार्दिक म्हणतो, कधीही स्वत:च्या स्वप्नांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करू नका. मी नशिबवान आणि आभारी आहे. आयपीएल लिलाव मला नेहमी याची आठवण करून देतो की आम्ही किती मोठा प्रवास पार केला आहे. वाचा- वाचा- आयपीएल २०१४ मध्ये हार्दिकवर सर्व प्रथम बोली लागली होती. तेव्हा त्याची बेस प्राइस १० लाख इतकी होती. विशेष म्हणजे हार्दिकला तेव्हा कोणीही विकत घेतले नव्हते. पण त्याच्या पुढील वर्षी मुंबई इंडियन्स ()ने १० लाखला हार्दिकला विकत घेतले. २०१५ मध्ये ९ सामन्यात धमाकेदार कामगिरी केल्यामुळे २०१६ च्या ऑस्टेलिया दौऱ्यात त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. वाचा- भारतीय संघात शानदार कामगिरी केल्यामुळे हार्दिकचा पगार देखील वाढला. प्रत्येक आयपीएलमध्ये त्याचा पगार ११ कोटींनी वाढला. २०१८ साली मुंबई संघाने त्याला रिटेन केली आणि पगार होता ४४.३ कोटी, तेव्हा हार्दिकने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने आयपीएल करिअरच्या शेवटच्या हंगामात ३८.२९ कोटी इतका पगार घेतला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3k2v4Oj
No comments:
Post a Comment