अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला १४५ धावा करता आल्या. इंग्लंडने पहिल्या डावात ११२ धावा केल्यामुळे टीम इंडियाने ३३ धावांची आघाडी घेतली. पहिल्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. कर्णधार जो रूटने ८ धावा देत ५ विकेट घेतल्या. वाचा- दुसऱ्या दिवशी ३ बाद ९९ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मैदानावर होते. भारत आज मोठी धावसंख्या उभी करून आघाडी घेईल असे वाटत होते. भारताने पहिल्या डावात १ धावांची आघाडी घेतल्यानंतर अजिंक्य रहाणे ७ धावांवर बाद झाला. जॅक लीचने त्याची विकेट घेतली. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्माला ६६ धावांवर बाद करत लीचने पाचवा धक्का दिला. वाचा- रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावण्याच काम केले. त्यानंतर भारताच्या सर्व विकेट इंग्लंडचा कर्णधार जो रूटने घेतल्या. त्याने ८ धावात ५ विकेट घेतल्या. कसोटीत रूटची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तर इंग्लंडकडून डे-नाइट क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. वाचा- रूटने प्रथम ऋषभ पंतला १ वर, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला शून्यावर, मग अक्षर पटेलला शून्यावर, अश्विनला १७वर आणि अखेर जसप्रीत बुमराहला १ धावांवर बाद करून भारताचा पहिला डाव १४५ धावात गुंडाळला. वाचा- फिरकीपटूंना साथ मिळणाऱ्या या मैदानावर फिरकीपटूंनी खळबळ उडवली आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत २० विकेट पडल्या आहेत. तर भारताच्या पहिल्या डावानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावातील पहिल्या ओव्हरच्या ३ चेंडूवर २ विकेट गमावल्या. त्यामुळे या सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागण्याची शक्यता आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37OPJR8
No comments:
Post a Comment