जयपूर: देशात सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मुंबई संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने पुन्हा एकदा स्फोटक फलंदाजी केली. पृथ्वी सध्या विजय हजारे ट्रॉफीत यासाठी खेळत आहे कारण तो भारतीय संघातून बाहेर आहे. पृथ्वीला खराब कामगिरीमुळे भारतीय संघातून डच्चू दिला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खराब कामगिरी करणाऱ्या पृथ्वीने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. वाचा- विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वीने दुसरे शतक झळकावले आहे. याआधी पहिल्या सामन्यात शतक करून त्याने कमबॅकचे संकेत दिले होते. आता दुसरे शतक करताना त्याने वादळी फलंदाजी केली. पृथ्वीने पुड्डुचेरीविरुद्ध फक्त ६५ चेंडूत शतक केले. त्याने या डावात ९९ चेंडूत २१ चौकार आणि २ षटकारांसह १४० धावा केल्या आहेत. (सामना सुरू आहे) याआधी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने ८९ चेंडूत १५ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या महाराष्ट्र विरुद्धच्या लढतीत त्याने फक्त ३४ धावा केल्या. वाचा- पृथ्वी केल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये होता. युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात त्याला धावा करता आल्या नव्हत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत तो एकाच पद्धतीने दोन्ही डावात शून्यावर बाद झाला होता. तेव्हा पृथ्वीवर प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे संघातून डच्चू दिला गेला आणि शुभमन गिलला संधी दिली गेली. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पृथ्वीने दमदार सुरूवात केली होती. त्याने पहिल्याच कसोटीत शतक झळकावले होते. पण त्यानंतर त्याला एकही शतक करता आले नाही. डोपिंग चाचणीत फेल झाल्याने त्याच्यावर काही महिन्यांची बंदी घातली गेली होती. पण त्यानंतर पृथ्वीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dEzObM
No comments:
Post a Comment