![](https://maharashtratimes.com/photo/81193819/photo-81193819.jpg)
अहमदाबाद, : तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सने नियम मोडल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघ फलंदाजी करत असताना १२व्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. भारतीय संघाला पहिला धक्का बसला. नेमकं घडलं तरी काय, पाहा...इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस ब्रॉडने यावेळी १२वे षटक टाकले. त्यानंतर १३वे षटक टाकण्यासाठी थोडा वेळ होता. त्यावेळी बेन स्टोक्सच्या हातामध्ये चेंडू होता. त्यावेळी स्टोक्सने चेंडू हातात घेत त्याला लाळ लावली. करोनानंतर आयसीसीने कडक नियम बनवले आहे. स्टोक्सने यावेळी या नियमांचा भंग केला. पंचांनी यावेळी स्टोक्सशी लगेचच संवाद साधला. पंचांनी स्टोक्सला ताकिद दिल्याचे म्हटले गेले, पण पंचांनी ताकिद दिली की नाही, याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. करोनानंतर नवीन नियम आहे तरी काय, पाहा...करोनानंतर क्रिकेटमध्ये आयसीसीने काही नवीन नियम केले आहेत. करोनानंतर जर कोणत्याही खेळाडूने चेंडूला लाळ किंवा थुंकी लावण्याचा प्रयत्न केला, तर तो नियमाचा भंग ठरेल. यावेळी पंच पहिल्यांदा या खेळाडूवा ताकिद देतील. पंचांना ताकिद दिल्यानंतरतही जर त्या खेळाडूने पुन्हा तीच गोष्ट केली तर संघाच्या पाच धावा कमी करण्यात येऊ शकतात. त्यामुळे आयसीसीच्या या नियमांचे पालन सर्वांनाच करावे लागणार आहे. इंग्लंडला यावेळी प्रथम फलंदाजी करताना फक्त ११२ धावाच करता आल्या. इशांत शर्माने तिसऱ्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने डॉमनिक सिबलीला शून्यावर बाद केले. त्यानंतर जॉनी बेयरस्टोला अक्षरने शून्यावर बाद करून इंग्लंडची अवस्था २ बाद २७ केली. बेयरस्टो बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटने क्रॉली सोबत ४७ धावांची भागिदारी केली. ही जोडी इंग्लंडला सावरेल असे वाटत असताना अश्विनने रुटची विकेट घेतली. त्यानंतर पहिले सत्र संपल्याआधी अक्षरने क्रॉलीला ५३ धावांवर बाद केले. दुसऱ्या सत्रात इंग्लंडची आणखी वाइट अवस्था झाली. ८१ धावांवर त्यांच्या दोन विकेट पडल्या. ओली पोपला अश्विनने तर अक्षरने बेन स्टोक्सला बाद केले. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना मोठी धावसंख्या उभी करू दिली नाही. जोफ्रा आर्चरला अक्षरने, जॅक लीचला अश्विनने बाद केले आणि पाहूण्यांची अवस्था ८ बाद ९८ अशी केली. अखेर च्या दोन फलंदाजांना झटपट बाद करून भारताने इंग्लंडला फक्त ११२ धावांवर रोखले. भारताकडून अक्षर पटेलने सलग दुसऱ्या कसोटीत पाच विकेट घेतल्या. त्याने ३८ धावात ६ विकेट घेतल्या. तर आर अश्विनने २६ धावात ३ विकेट घेतल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qQhcJJ
No comments:
Post a Comment