डुडलिन: 2nd t20i ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने ४ धावांनी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने ७ बाद २१९ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाला २० षटकात ८ बाद २१५ धावा करता आल्या. वाचा- दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिल(Martin Guptill )ने ५० चेंडूत ९७ धावा केल्या. त्याचे शतक फक्त ३ धावांनी हुकले. गप्टिलने ६ चौकार आणि ८ षटकार मारले. या शिवाय कर्णधार केन विलियमसनने ३५ चेंडूत ५३ तर निशमने १६ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या. त्याने ६ षटकार खेचले. या लढतीत गप्टिलला शतक पूर्ण करता आले नाही. पण टी-२० क्रिकेटमधील एक मोठा विक्रम त्याने केला. वाचा- गप्टिलने या सामन्यात भारताचा हिटमॅन ()चा विक्रम मागे टाकला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या गप्टिलने या सामन्यात ८ षटकार मारले. त्याने १९४च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. टी-२०मध्ये त्याच्या नावावर १३२ षटकार झाले आहेत. रोहितच्या नावावर १२७ षटकार असून आज गप्टिलने त्याला मागे टाकले. वाचा- या दोघानंतर टी-२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन (११३), न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो (१०७), वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (१०५) यांचा क्रमांक लागतो. या पाच फलंदाजांनी टी-२० मध्ये १००हून अधिक षटकार मारले आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंच आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅकलम यांनी अनुक्रमे ९७ आणि ९१ षटकार मारले आहेत. आजच्या सामन्यात गप्टिलच्या धमाकेदार फलंदाजीमुळे न्यूझीलंडला विजय मिळवता आला. भारत आणि इंग्लंड यांच्यात थोड्याच दिवसात टी-२० मालिका होणार आहे. तेव्हा रोहितला हा विक्रम पुन्हा स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qSUrVu
No comments:
Post a Comment