अहमदाबाद, : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला मिळाले. नेमकं घडलं तरी काय, पाहा...ही गोष्ट घडली ती ३०व्या षटकात. यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिलाच चेंडू अँडरसनने कोहलीच्या अंगाच्या दिशेने टाकला. कोहली त्यावेळी फटका मारण्यासाठी सरसावला. पण कोहलीचा हा फटका चुकला आणि हा चेंडू थेट इंग्लंडच्या खेळाडूच्या हातात विसावणार, असे स्पष्ट दिसत होते. हा चेंडू इंग्लंडच्या खेळाडूच्या हातामध्ये तर गेला, पण त्यानंतर त्याचे झेलमध्ये रुपांतर या खेळाडूला करता आले नाही. कारण चेंडू त्याच्या हातावर आदळून उडाला आणि थेट मैदानात पडला. त्यामुळे कोहलीला बाद करण्याची ही संधी इंग्लंडच्या ऑलिव्हर पोपने गमावली. त्यावेळी कोहली हा २४ धावांवर खेळत होता. पण त्यानंतर २७ धावांवर असताना कोहली बाद झाला. कोहली जेव्हा फलंदाजी आला तेव्हा भारताला दोन षटकांमध्ये दोन धक्के बसले होते. कारण सलामीवीर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा हे दोघेही सहा चेंडूंच्या फरकामध्ये बाद झाले होते. त्यामुळे कोहलीचे खेळपट्टीवर राहणे महत्वाचे होते. कोहली आणि रोहित शर्मा यांनी यावेळी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही रचली. रोहितने यावेळी अर्धशतकही पूर्ण केले. ही जोडी आता किती धावा करुन भारताला केवढी मोठी धावसंख्या उभारुन देते, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. इंग्लंडला यावेळी ११२ धावांवरच समाधान मानावे लागले होते. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारतीय संघाची सुरुवात आश्वासक झाली नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने यावेळी भारताचा सलामीवीर शुभमन गिलला बाद केले. गिलला यावेळी ११ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर पुढच्याच षटकात चेतेश्वर पुजाराही बाद झाला. पुजाराला यावेळी आपले खातेही उघडता आले नाही. पण त्यानंतर रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळेच भारताला पहिल्या दिवशी चांगली धावसंख्या उभारता आली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37JTp6C
No comments:
Post a Comment