नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे Road Safety World Series ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता ही स्पर्धा पुन्हा होणार आहे. येत्या ५ मार्चपासून स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत ४ सामने झाले आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये एकूण सहा संघ आहेत. यात भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका या देशातील दिग्गज खेळाडू सहभागी आहेत. वाचा- भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण हे खेळाडू आहेत. तर इंग्लंडकडून माजी कर्णधार केव्हिन पिटरसन हा देखील खेळणार आहे. स्पर्धेतील पहिली लढत ५ मार्च रोजी इंडियन लेजेंड्स विरुद्ध बांगलादेश लेजेंड्स यांच्यात इंदुर येथे होणार आहे. या स्पर्धेतील सर्व लढती शहीद नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत. वाचा- असा आहे भारतीय संघ- सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहेवाग, युवराज सिंग, जहीर खान, मोहम्मद कैफ, इरफान पठाण, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, मनप्रीत गोनी, नमन ओझा, प्रज्ञान ओझा, युसूफ पठाण स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक वाचा- या स्पर्धेतील सर्व लढती संध्याकाळी सात वाजता सुरू होतील. हे सामने कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स रिश्ते या चॅनलवर लाइव्ह पाहता येईल. तर ऑनलाइन Voot app आणि जिओ टीव्हीवर हे सामने पाहता येतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pURC4N
No comments:
Post a Comment