अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २४ तारखेपासून अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या मैदानावर होणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असून तो डे-नाइट होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ अशा बरोबरीत आहेत. वाचा- चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने तर दुसऱ्या कसोटीत भारताने विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माने १६१ धावांची खेळी केली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीआधी त्याने भारतीय फलंदाजांना सावध केले आहे. भारतीय संघाची ही फक्त तिसरी आहे. त्या तुलनेत इंग्लंडने अधिक डे-नाइट कसोटी सामने खेळले आहेत. वाचा- अहमदाबाद येथे होणाऱ्या कसोटीआधी रोहितने फलंदाजांना सामन्यातील सर्वात धोकादायक वेळ कोणती असेल याबाबत सांगितले आहे. डे-नाइट कसोटीत संध्याकाळची वेळ ही सर्वात महत्त्वाची ठरेल. या वेळी फलंदाजी करताना अधिक सावध आणि एकाग्रता दाखवावी लागेल असे रोहित म्हणाला. रोहितने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळला होता. पण तेव्हा त्याला संध्याकाळच्या वेळी फलंदाजी करण्यास मिळाली नव्हती. वाचा- मी माझ्या संघातील सहकाऱ्यांशी हेच ऐकले आहे. बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या एका गुलाबी चेंडूच्या कसोटीत मला संध्याकाळच्या वेळी फलंदाजी करण्यास मिळाली नव्हती, जेव्हा सूर्यास्त होत असतो. संध्याकाळच्या वेळी फलंदाजीकरणे थोडे आव्हानात्मक असते. वातावरण आणि प्रकाश यात बदल होतो. त्यामुळे तुम्हाला अधिक सतर्क आणि एकाग्र रहावे लागते. फलंदाजांसाठी ही वेळ अधिक आव्हानात्मक ठरते. परिस्थीतीनुसार फलंदाजी करणे गरजेचे असते असे रोहितने सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sewYhv
No comments:
Post a Comment