मुंबई : आज सर्व ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. पण यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने शिवजयंतीच्या निमित्ताने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने चक्क इतिहास चुकीचा होता, असं म्हटलं आहे. सेहवागचे हे ट्विट आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " इतिहासाने आपल्याला सांगितलं की, शक्तीशाली लोकं ही शक्तीशाली जागेमधूनच येतात. पण इतिहास चुकीचा आहे. शक्तीशाली लोकं ही जागा शक्तीशाली बनवतात." सेहवागला आपल्या ट्विटमधून म्हणायचे आहे की, " जी व्यक्ती खरंच शक्तीशाली, सामर्थ्यवान आहे, ती लोकं चांगल्या गोष्टी घडवत असतात. त्यासाठी त्यांनी शक्तीशाली जागेमधूनच येण्याची गरज नसते. त्यामुळे इतिहासामध्ये आपल्या जे सांगितले गेले आहे की, शक्तीशाली जागांमधून अशा मोठ्या व्यक्ती येत असतात, ते चुकीचे आहे." सेहवागने आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, " शिवजयंतीच्या निमित्ताने महान छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय भवानी...." सेहवागच्या या ट्विटला जवळपास ७० हजार लोकांनी लाइक केले आहे. त्याचबरोबर सेहवागचे ट्विट बऱ्याच जणांना आवडले आहे. त्यामुळे सेहवागचे हे ट्विट सध्याच्या घडीला चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. सेहवाग हा नेहमीच काही औचित्य साधून ट्विट करत असतो आणि त्याच्या या ट्विट्सना चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबरोबर त्याच्या ट्विटमधील खुसखुशीत भाषाही चाहत्यांना चांगलीच आवडत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सेहवागला ट्विटरवर चांगला प्रतिसाद मिळतो. सध्याच्या घडीला कोणत्याही गोष्टीने वाद होऊ शकतात. काही वेळा एखादी व्यक्ती नेमकं काय सांगते आहे, हे समजून न घेता त्याचा अर्थ लावला जातो आणि वादाला सुरुवात होते. त्यामुळे सेहवागचे ट्विट ज्यांनी पूर्णपणे पाहिले नसेल, तर त्यांचाही असाच वेगळा भ्रम होऊ शकतो. कारण सेहवागने छत्रपती शिवाजी महाराजांना कुर्निसातही यावेळी केला आहे. त्यामुळे सेहवाग त्यांच्याबद्दल वाईट बोललेला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Zufxx5
No comments:
Post a Comment