अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना भारतीय संघ आज २४ फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर सुरू होणार आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या मैदानावर होणारा हा पहिला डे-नाइट म्हणजे गुलाबी चेंडूने होणारा कसोटी सामना असेल. भारत आणि इंग्लंड ( ) यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. पहिल्या दोन लढती चेन्नईत झाल्या होत्या. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात ३१७ धावांनी शानदार विजय मिळवला होता. वाचा- असे आहे पिच पिंक बॉलने खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची ठरणार आहे. अशा सामन्यांसाठी क्युरेटर खेळपट्टीवर अतिरिक्त गवत सोडतात. जेणेकरून चेंडूची चमक अधिक वेळ राहिल. मोटेरा मैदानावरील गवत एक दिवस आधी काढण्यात आले आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की जलद गोलंदाजांना मदत मिळेल. त्याच बरोबर फिरकी गोलंदाजांना देखील टर्न मिळू शकतो. फलंदाजांनी सावधपणे खेळ केला तर ते मोठी धावसंख्या उभी करू शकतील. डे-नाइट टेस्ट असल्यामुळे दव फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो. वाचा- हवामान अहमदाबाद येथे होणारा हा सामना दुपारी २.३० वाजता सुरू होईल. गुजरातमधील वातावरण पाहता उकाडा अधीक असेल. दुपारी ३ वाजता तापमान ३३ ते ३४ डिग्री तर रात्री १० वाजता २७ डिग्री इतके असू शकते. संध्याकाळच्या वेळेत हवामानात बदल होऊ शकतो. दवामुळे दिवसाचे अखेर सत्र महत्त्वाचे ठरू शकते. वाचा- नाणेफेक जिंकल्यास जगातील सर्वात मोठ्या मैदानावर होणाऱ्या या डे-नाइट कसोटीसाठीची खेळपट्टी आणि हवामान पाहता टॉस जिंकल्यास प्रथम फलंदाजी करणे फायद्याची ठरू शकते. टॉस जिंकल्यावर कर्णधार फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. जेणे करून सुरुवातीच्या सत्रात फलंदाजी करत धावा करता येतील. वाचा- पाच गोलंदाज भारतीय संघ पाच गोलंदाजांसह या सामन्यात उतरू शकतो. यात उमेश यादवला शार्दुल ठाकूरच्या जागी घेण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा समावेश अंतिम ११ मध्ये होऊ शकतो. इंग्लंडच्या संघात जेम्स एडरसन आणि जोफ्रा आर्चर यांना घेतले जाऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PayvqZ
No comments:
Post a Comment