ख्राइस्टचर्च: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका आजपासून सुरू झाली. पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ५३ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वाचा- पहिल्या टी-२० सामन्यात एका खेळाडूवर सर्वांची नजर होती, तो म्हणजे न्यूझीलंडचा युवा वेगवान गोलंदाज (kyle jamieson) होय. पण प्रत्यक्षात ज्या खेळाडूवर आयपीएल लिलावात कोणी बोलीच लावली नाही अशा खेळाडूने वादळी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. वाचा- न्यूझीलंडकडून फक्त ६ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या () याने पहिल्या टी-२० लढतीत ५९ चेंडूत ३ षटकार आणि १० चौकारांसह नाबाद ९९ धावा केल्या. सामन्यात एक वेळ अशी होती जेव्हा न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १९ असी होती. तेव्हा डेवोनने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेवोनच्या धमाकेदार फलंदाजीमुळे यजमान संघाने ५ बाद १८४ धावा केल्या. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ १७.३ षटकात १३१ धावांवर बाद झाला. इश सोदीने चार विकेट घेतल्या तर आयपीएलमध्ये १५ कोटींची बोली लागलेल्या जेमिन्सनने ३ षटकात ३२ धावा देत १ विकेट घेतली. वाचा- वाचा- काही दिवासांपूर्वी झालेल्या आयपीएल लिलावात डेवोनला कोणी खरेदी केले नाही. त्याची बेस प्राइस ५० लाख रुपये इतकी होती. डेवोनच्या या खेळीनंतर भारताचा फिरकीपटू आर अश्विनने एक मजेशी ट्विट पोस्ट केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZDj50b
No comments:
Post a Comment