चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी काल चेन्नईत झालेल्या लिलावात ( ) आठ संघांनी ६१ खेळाडूंपैकी ५७ जणांवर बोली लावली. यातील २२ खेळाडू परदेशातील होते. ख्रिस मॉरिस याला राजस्थान रॉयल्सने १६ कोटी २५ लाखांना विकत घेतले. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. कायले जेमिन्सन याला RCBने १५ कोटींना तर ग्लेन मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनेच १४ कोटी २५ लाखांना विकत घेतले. वाचा- ... जाणून घेऊयात आयपीएलच्या मिनी लिलावात कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना किती रुपयांना विकत घेतले. चेन्नई सुपर किंग्ज ()-आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने लिलावात ग्लेन मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी आरसीबीविरुद्ध सोबत मोठी बोली लावली. पण त्यांना बाजी मारता आली नाही. या लिलावात चेन्नईने विकत घेतलेले खेळाडू... के गौतम-९.२५ कोटी मोइन अली- ७ कोटी चेतश्वर पुजारा-५० लाख के भगत वर्मा- २० लाख सी हरी निशांत- २० लाख एम हरिनकर रेड्डी- २० लाख वाचा- दिल्ली कॅपिटल्स ()- गेल्या हंगामात अंतिम फेरीत धडक मारलेल्या दिल्ली कॅपिटल्सने यावर्षी मोठ्या खेळाडूंची खरेदी केली नाही. पण राजस्थानचा माजी कर्णधार स्मिथला २.२ कोटींना विकत घेतले. त्याच बरोबर टॉम कुरेनला ५.२५ कोटी मोजले. टॉम कुरेन- ५.२५ कोटी स्टीव्ह स्मिथ- २.२ कोटी सॅम बिलिंग्स-२ कोटी उमेश यादव- १ कोटी रिपल पटेल- २० लाख विष्णु विनोद- २० लाख लुकमान मेरीवाल- २० लाख एम सिद्धार्थ- २० लाख कोलकाता नाइट रायडर्स ()- शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या मालकीच्या केकेआरने लिलावात फार उत्सुकता दाखवली नाही. त्यांनी बांगलादेशच्या शाकीबसाठी सर्वात जास्त बोली लावली. तर चेन्नईने रिलीझ केलेल्या हरभजन सिंगला बेस प्राइसला विकत घेतले. शाकिब अल हसन- ३.२ कोटी हरभजन सिंग-२ कोटी बेन कटिंग- ७५ लाख करुण नायर- ५० लाख पवन नेगी- ५० लाख शेल्डन जॅक्सन- २० लाख वेंकटेश अय्यर-२० लाख वैभव अरोडा- २० लाख मुंबई इंडियन्स ()- आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने काही ठरावी खेळाडूंवर बोली लावली. मुंबईने लिलावात खरेदी केलेले खेळाडू... नाथन कूल्टर नाइल- ५ कोटी एडम मिल्ने- ३.२ कोटी पियूष चावला- २.४ कोटी जेम्स नीशम- ५० लाख युद्धवीर चरक- २० लाख मार्को जेनसेन- २० लाख अर्जुन तेंडुलकर- २० लाख पंजाब किंग्ज (PK)- लिलावात सर्वाधिक पैसे असलेल्या पंजाब संघाने खेळाडूंसाठी मोठी रक्कम खर्च केली. जाणून घेऊयात त्याच्या ताफ्यात कोणते खेळाडू आहेत. जाय रिचर्डसन- १४ कोटी रिले मेरेडिथ- ८ कोटी शाहरुख खान- ५.२५ कोटी मोइजेस हेनरिक्स- ४.२ कोटी डेव्हिड मलान- १.५ कोटी फॅबियन एलेन- ७५ लाख जलज सक्सेना- ३० लाख सौरभ कुमार- २० लाख उत्कर्ष सिंह- २० लाख राजस्थान रॉयल्स ()- २०२१च्या लिलावात सर्वात महाग खेळाडू खरेदी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने मोठी बोली लावण्यात हात आखडता घेतला नाही. त्यांनी ख्रिस मॉरिसला १६.२५ कोटींना विकत घेतले. राजस्थानने विकत घेतलेले खेळाडू... ख्रिस मॉरिस-१६.२५ कोटी शिवम दुबे-४.४ कोटी चेतन सकारिया-१.२ कोटी मुस्ताफिजुर रहमान-१ कोटी लियाम लिविंगस्टोन-७५ लाख आकाश सिंह-२० लाख केसी करियप्पा- २० लाख कुलदीप यादव- २० लाख रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ()- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने देखील खेळाडूंवर भरपूर पैसे खर्च केले. कायले जेमिन्सन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन महाग खेळाडूंची खरेदी आरसीबीने केली. कायले जेमिन्सन-१५ कोटी ग्लेन मॅक्सवेल- १४.२५ कोटी डॅन ख्रिश्चियन-४.८ कोटी सचिन बेबी- २० लाख रजत पाटीदार- २० लाख मोहम्मद अझरूद्दीन- २० लाख सुयश प्रभुदेसाई- २० लाख केएस भारत- २० लाख सनरायजर्स हैदराबाद ()- आयपीएल लिलावात सर्वात कमी उत्सुकता दाखवलेला संघ म्हणजे हैदराबाद होय. त्यांनी लिलावात फक्त ३ खेळाडूंची खरेदी केली. चेन्नईने रिलीझ केलेल्या केदार जाधवला हैदराबादने बेस प्राइसला विकत घेतले. केदार जाधव- २ कोटी मुजीब उर रहमान- १.५ कोटी जे सुचित- ३० कोटी
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3auzcmZ
No comments:
Post a Comment