नवी दिल्ली: इंग्लंडला भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेटने पराभव स्विकारावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या डे-नाइट सामन्यात भारताने दोन दिवसात इंग्लंडचा पराभव केला. भारताकडून अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी शानदार गोलंदाजी केली. इंग्लंडला पहिल्या डावात ११२ तर दुसऱ्या डावात ८१ धावा करता आल्या. वाचा- तिसऱ्या कसोटीत फक्त एका फिरकीपटूसह मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघावर ( ) यांनी जोरदार हल्ला चढवला. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फक्त ८१ धावा करू शकला. त्यामुळे भारताला विजयासाठी फक्त ४९ धावांचे आव्हान मिळले. वाचा- बॉयकॉट यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. तर इंग्लंडला फटकारले. अहमदाबादच्या फिरकीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय कोणाचा होता. इंग्लंडने अंतिम ११ मध्ये जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना स्थान दिले होते. वाचा- ज्या कोणी तीन वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला असेल त्याला लाज वाटली पाहिजे. पिंक बॉल कसोटी खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाला याची कल्पना हवी होती की ते अहमदाबाद येथे खेळणार आहेत एडिलेडमध्ये नाही. वाचा- एका चाहत्याने पिच संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, कोणत्याही नियमात याचा उल्लेख केला नाही की एखाद्या संघाने पिच कशा पद्धतीने तयार करावे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NAMplL
No comments:
Post a Comment