: गेल्या वर्षी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी भूमिपूजन केले होते. तेव्हा पाकिस्तानमधील एका क्रिकेटपटूने त्यावर आनंद व्यक्त केला होता. इतक नव्हे तर त्याने अयोध्येत येऊन श्री रामाचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले होते. आता याच खेळाडूने शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे. वाचा- पाकिस्तानचा माजी फिरकीपटू () सोशल मीडियावर त्याची मते स्पष्टपणे व्यक्त करत असतो. यामुळे तो नेहमी चर्चेत देखील येत असतो. गेल्या वर्षी त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आरोप केले होते. पाकिस्तान बोर्ड कठीण काळात खेळाडूंना पाठिंबा देत नाही, असे तो म्हणाला होता. वाचा- आता कनेरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो पत्नी धर्मितासह सत्यनारायणाची पूजा () करताना दिसतोय. कराची झाली पूजा हा व्हिडिओ कनेरियाची पत्नी धर्मिताच्या घरातील आहे. कराचीतील सत्यनारायण स्वामी मंदिरात ही पूजा आयोजित करण्यात आली होती. व्हिडियोत दानिश पूजा पाठ करताना दिसतोय. वाचा- पाकिस्तानकडून ६२ कसोटी खेळणाऱ्या दानिशने २६१ विकेट घेतल्या आहेत. त्याने १८ वनडेत १५ विकेट घेतल्या आहेत. २०१० साली त्याने अखेरची कसोटी खेळली होती. त्याचा जन्म पाकिस्तानमधील कराचीमध्ये झाला असला तरी भारतातील गुजरातशी कौटुंबिक संबंध आहेत. कनेरियाचे कुटुंबीय सुरतमधून पाकिस्तानमध्ये गेले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aMc2J8
No comments:
Post a Comment