नवी दिल्ली: भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन()ने एक वादळी खेळी केली आहे. विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून खेळणाऱ्या शिखरने शतक झळकावले आणि फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. वाचा- विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या तीन लढतीत शिखर धावा करण्यात अपयशी ठरला होता. पण चौथ्या सामन्यात त्याने महाराष्ट्र विरुद्ध धमाकेदार फलंदाजी केली. त्याने १५३ धावांची खेळी केली. पहिल्या तीन लढतीत शिखरला ०,६,० अशा धावा करता आल्या होत्या. वाचा- शिखरने ध्रुव शौरीसोबत पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागिदारी केली. त्यानंतर क्षितिज शर्मासह १०१ धावा जोडल्या. शिखरने या सामन्यात ११८ चेंडूत १ षटकार आणि २१ चौकारांसह १५३ धावा केल्या. त्याने १२९.६६च्या सरासरीने धावा केल्या. वाचा- ... वाचा- या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करत सात बाद ३२८ धावा केल्या दिल्लीने विजयाचे लक्ष्य ४९.२ षटकात ७ विकेटच्या बदल्यात पार केले. दिल्लीकडून ध्रुव शौरीने ६१, नितिश राणाने २७ धावा केल्या. वाचा- महाराष्ट्राकडून केदार जाधवने ८१ चेंडूत ८६ धावा केल्या त्याने १० चौकार मारले. तर आजिम काझीने ७३ चेंडूत २ षटकार आणि १० चौकारांसह ९१ धावा केल्या. या शिवाय यश नायरने ४५ धावांचे योगदान दिले. कर्णधार ऋतुराज गायकवाडने १३ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aWWDpl
No comments:
Post a Comment