मुंबई : आरसीबीच्या संघातील सलामीवीर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण एका सामन्यात फक्त चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत या सलामीवीराने शतक झळकावले आहे. आरसीबीचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कलने विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या संघाकडून खेळताना धडाकेबाज शतक साकारल्याचे पाहाययला मिळाले आहे. हा सामना कर्नाटक आणि उडीसा यांच्यामध्ये झाला. या सामन्यात फलंदाजी करत असताना पडीक्कलने चक्क १४ चौकार आणि पाच षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात पडीक्कलने तुफानी फलंदाजी केली. त्याचबरोबर संघाला यावेळी १४० धावांची सलामीही करुन दिली. पडीक्कलने यावेळी फक्त आपलीच फलंदाजी पाहिली नाही, तर त्याने संघातील फलंदाजांना साथ घेत चांगल्या भागीदाऱ्याही रचल्या. यावेळी पडीक्कलने १४० चेंडूंचा सामान केला. यामध्ये पडीक्कलने १४ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने १५२ धावांची दमदार खेळी साकारली. पडीक्कलच्या या तुफानी खेळीच्या जोरावर कर्नाटकला ५० षटकांमध्ये ३२९ धावांचा डोंगर उभारता आला. गेल्यावर्षी झालेल्या आयपीएमध्ये पडीक्कलला पहिल्यांदा संधी दिली होती. पडीक्कलने या संधीचे सोने केले होते. गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये पडीक्कलने काही महत्वपूर्ण खेळी साकारल्या होत्या. त्याचबरोबर संघाला बऱ्याचदा चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यामुळेच गेल्या वर्षात पडीक्कलचे नाव चांगलेच चर्चेत राहिले होते. त्यामुळे आता या वर्षीच्या आयपीएलमध्ये पडीक्कलकडून संघाला नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NT1Aqe
No comments:
Post a Comment