नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्या २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावर होणारी ही लढत डे-नाइट असणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत. डे-नाइट कसोटीत भारताकडे इंग्लंडपेक्षा कमी अनुभव आहे. टीम इंडियने बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या पहिल्या डे-नाइट कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात खेळलेल्या दुसऱ्या लढतीत त्यांचा पराभव झाला होता. वाचा- भारतीय संघाने खेळलेल्या अखरेच्या डे-नाइट कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा ३६ धावांवर ऑल आउट झाला होता. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारतीय संघाला याची आठवण करुन दिली. अर्थात रूटच्या या वक्तव्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम जाफरने सडेतोड उत्तर दिले. इएसपीएन क्रिकइन्फोने जो रूटच्या पत्रकार परिषदेतील त्या गोष्टीचा उल्लेख केला आहे ज्यात त्याने भारतीय संघाचा ३६ धावसंख्येवर ऑल आउट झाल्याचे म्हटले होते. भारतीय संघाच्या मनात ही गोष्ट कुठे ना कुठे सुरूच असेल. त्यावर जाफरने उत्तर दिले आहे. वाचा- जाफर म्हणतो, गेल्या वेळी जेव्हा इंग्लंडने डे-नाइट कसोटी खेळली होती तेव्हा त्यांचे ९ विकेट २७ धावांवर पडल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या त्या सामन्यात इंग्लंडचा ५८ धावांवर ऑला आउट झाला होता. मी फक्त सांगितले. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन टेस्ट मॅच चेन्नईत झाल्या होत्या. पहिल्या लढतीत इंग्लंडने २२७ ने तर दुसऱ्या लढतीत भारताने ३१७ धावांनी शानदार विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली होती. दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. न्यूझीलंड याआधीच फायनलमध्ये पोहोचले आहे. या मालिकेच्या निकालावर भारत, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यापैकी एक संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NutmJy
No comments:
Post a Comment