नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी ()ने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीचा निर्णय हा फक्त चाहत्यांना नाही तर निवड समितीसाठी देखील धक्कादायक होता. धोनीने एक वर्ष क्रिकेट खेळले नव्हते. २०१९च्या वर्ल्डकपनंतर त्याने विश्रांती घेतली होती. चाहत्यांना अशी अपेक्षा होती की तो खेळले. पण तसे झाले नाही. आयपीएलच्या १३व्या हंगामाआधी त्याने निवृत्त घेतली. वाचा- भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे सदस्य सरनदीप सिंह यांनी धोनी बाबत एक मोठा खुलासा केला आहे. निवड समितीची इच्छा होती की धोनीने टी-२० वर्ल्डकप खेळावा. कारण तो फीट होता. टी-२० वर्ल्डकप ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार होता. पण करोना व्हायरसमुळे तो स्थगित करण्यात आला. धोनीने निवृत्ती घेतली होती. कारण तो आणखी एक वर्ष वाट पाहू शकत नव्हता. त्याच वेळी त्याने आणखी काही वर्ष आयपीएल खेळणार असल्याचे जाहीर केले. वाचा- निश्चितपणे धोनीने खेळले पाहिजे होते. आम्ही देखील हाच विचार करत होतो की त्याने टी-२० वर्ल्डकप खेळावा. त्याने न खेळण्याचे काही कारण नव्हते. तो पहिल्या प्रमाणे फिट होता. धोनीने कधीच सरावात ब्रेक घेतला नव्हता. जो सराव ऐच्छिक असतो त्यासाठी देखील धोनी उपस्थित असायचा. त्याच बरोबर असे कधी झाले नाही की धोनी दुखापतीमुळे मैदानाबाहेर झाला. त्यामुळे धोनीने वर्ल्डकप खेळावा असे आम्हाला वाटत होते, असे सरनदीप म्हणाले. वाचा- धोनीने देशाला इतक्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिली आहेत. त्यामुळे ही संधी त्याला मिळायला हवी होती, असे सरनदीप सिंह यांनी सांगितले. सिंह यांचा निवड समितीमधील कार्यकाळ २०२० मध्ये संपला. ते सदस्य असताना २०१९च्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड झाली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aGKt3U
No comments:
Post a Comment