चेन्नई, : आयपीएलच्या लिलावाला काही अवधी शिल्लक असताना एका खेळाडूने आपलं नावं परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूसाठी दोन कोटी एवढी बेस प्राइज ठेवण्यात आली होती. पण लिलावाच्या काही मिनिटांपूर्वीच त्याने आपलं नाव परत घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सची या खेळाडूवर नजर होती. कारण वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या जागी या खेळाडूला मुंबईच्या संघाला आपल्या ताफ्यात सामील करायचे होते. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने आयपीएलच्या लिलावातून आपलं नाव परत घेतलं आहे. वुडला भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. पण आता भारताविरुद्धच्या अन्य सामन्यांमध्ये मात्र वुड खेळणार आहे. पण असे असले तरी त्याने आयपीएलच्या लिलावातून मात्र आपलं नाव परत घेतलं आहे. वुडने लिलावापूर्वी आपलं नाव परत घेतल्यामुळे बऱ्याच जणांना धक्का बसला आहे. कारण वुडला लिलावात किमान दोन कोटी रुपये तरी मिळाले असते. पण यावेळी पैशाला महत्व न देता त्याने आपल्या कुटुंबियांना वेळ देण्याचे ठरवले आहे. कुटुंबियांना वेळ द्यायचा असल्यामुळे वुडने आयपीएलच्या पैशांवर पाणी फेरले आहे. मुंबई इंडियन्सने गेल्या वर्षी वुडला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न केला होता. मलिंगाच्या जागी पर्यायी गोलंदाजी म्हणून वुडची निवड करण्यासाठी मुंबईचा संघ प्रयत्नशील होता. पण वुडने त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाची ऑफर नाकारली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाने वुडऐवजी जेम्स पॅटीन्सनला संघात स्थान दिले होते. २०१८ साली चेन्नई सुपर किंग्स संघाने वुडला आपल्या संघात स्थान दिले होते. त्यावर्षी चेन्नईच्या संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्या मोसमात वुडला फक्त एकदाच संधी देण्यात आली होती. त्यावेळी वुडची गोलंदाजी चांगली झाली नव्हती. कारण वुडने चार षटकांमध्ये ४९ धावा दिल्या होत्या. त्यानंतर वुडला चेन्नईच्या संघाने संधी दिली नव्हती. त्यानंतर वुडने गेल्या दोन वर्षांत आयपीएलचा एकही सामना खेळेलला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZyhoAZ
No comments:
Post a Comment