नवी दिल्ली: () त भारताचा युवा फलंदाज ( ) धमाकेदार फलंदाजी करत आहे. आज जयपूरच्या सवाइ मानसिंह स्टेडियमवर पुड्डूचेरीविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद २२७ धावा केल्या. या आधी त्याने एक शतक झळकावले आहे. पृथ्वी सोबतच आणखी एक युवा फलंदाज आहे ज्याने धमाकेदार फलंदाजी केली आहे. हा फलंदाज म्हणजे झारखंडचा कर्णधार आणि विकेटकिपर () होय. त्याने १७३ धावा केल्या होत्या. वाचा- आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना इशानला सर्वांनी पाहिले आहे. आता इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी बॅकअप विकेटकिपर म्हणून इशांनचा संघात समावेश करण्यात आला आहे. विजय हजारे ट्रॉफीत ज्या पद्धतीने पृथ्वी शॉ फलंदाजी करत आहे, अशीच कामगिरी त्याने सुरू ठेवली तर भारतीय संघात त्याला पुन्हा संधी मिळू शकते. वाचा- पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफीतील सर्वोच्च धावसंख्या केली. त्याच्या सोबत सूर्यकुमार यादवने ५८ चेंडूत १३३ धावा केल्या होत्या. भारताकडून ५ कसोटी आणि ३ वनडे खेळणाऱ्या पृथ्वीने संजू सॅमसनचा २१२ धावांचा विक्रम मोडला. त्याने २०१९ साली गोव्या विरुद्ध ही खेळी केली होती. पृथ्वीने आजच्या खेळीत ३१ चौकार आणि ५ षटकार मारले. पृथ्वीच्या या शानदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाने भारतीय भूमीवर कोणत्याही संघाने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम केला. मुंबईने ५० षटकात ४५७ धावा केल्या. पृथ्वीचे हे प्रथम श्रेणीतील पहिले द्विशतक ठरले. विजय हजारे स्पर्धेत २०१८ साली कर्ण वीर कौशलने उत्तराखंडकडून खेळताना सिक्कीम विरुद्ध २०२ धावा केल्या होत्या. या स्पर्धेतील हे पहिले द्विशतक होते. वाचा- इशान किशनला भारतीय संघात टी-२० साठी संधी मिळाली आहे. पण तो ऋषभ पंतला बॅकअप विकेटकिपर म्हणून संघात असेल. त्याने २० फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावा केल्या होत्या. इशानच्या या कामगिरीमुळे त्याला पृथ्वी शॉ प्रमाणे भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. वाचा- कसोटी मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. विजय हजारे ट्ऱॉफीत पृथ्वी आणि इशान यांनी अशीच कामगिरी ठेवली तर पृथ्वीसाठी पुन्हा एकदा भारतीय संघाचे दरवाजे उघडले जातील तर इशानला देखील वनडे संघात संधी मिळू शकेल किंवा इशानला टी-२० मालिकेत अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NGXwcP
No comments:
Post a Comment