चेन्नई : आयपीएलचा लिलाव संपल्यावर फक्त दोन मिनिटांमध्येच भारताचा कर्णधार विराट कोहलीने नेमका कोणाला मेसेज केला होता, ही गोष्ट आता समरो आली आहे. कारण ज्या व्यक्तीला कोहलीने मेसेज केला होता, त्यानेच या गोष्टीचा खुलासा केला आहे. या लिलावात आरबीने बऱ्याच खेळाडूंना संधी दिली. ग्लेन मॅक्सवेलला गेल्यावर्षीपेक्षा जास्त किंमत मोजत त्यांनी आपल्या संघात सामील करुन घेतले. त्याचबरोबर कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने यावेळी काही युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे. यावेळी एका युवा खेळाडूनेच कोहलीच्या मेसेजचा खुलासा केला आहे. आरसीबीच्या संघाने यावेळी २० लाख रुपये मोजत मोहम्मद अझरुद्दीन या युवा खेळाडूला आपल्या संघात दाखल करुन घेतले. अझरुद्दीनने लिलावापूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती आणि त्यामुळेच त्याला लिलावातही सामील करण्यात आले होते. विराट कोहलीबरबर खेळण्याचे आपले स्वप्न होते आणि आता ते पूर्ण होणार आहे, असे अझरुद्दीनने सांगितले. अझरुद्दीन यावेळी म्हणाला की, " लिलावाच्या दोन मिनिटांनंतर मला विराट कोहलीचा एक मेसेज आहे. या मेसेजमध्ये लिहिले होते की, वेलकम टू , ऑल दी बेस्ट, विराट हीअर. या मेसेजनंतर मी फारच भावुक झालो होतो. ही एक अशी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली की ज्याचा मी कधीही विचारदेखील केला नव्हता. विराटचा मला मेसेजचे येणे हे माझ्यासाठी तरी अनपेक्षित होते." अझरुद्दीन पुढे म्हणाला की, " मी एक सलामीवीर आहे. त्यामुळे मी संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकतो. जर मला चांगली सुरुवात मिळाली तर नक्कीच माझ्या बॅटमधून जास्त धावाही येऊ शकतात. पण सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की, संघाला माझी गरज नेमकी काय आहे. जी संघाची गरज असेल तिच माझ्यासाठी फार महत्वाची असेल. मी नेहमीच संघाची गरज पहिली पाहेन आणि त्यानुसार खेळ करण्याचा प्रयत्न करेन." अझरुद्दीन हा एक यष्टीरक्षक-सलामीवीर आहे. त्यामुळे आरसीबीला अझरुद्दीन रुपात एक चांगला खेळाडू मिळाला आहे. अझरुद्दीनच्या संघात येण्याने आरसीबीचा सलामीचा प्रश्न सुटू शकेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NwiBXl
No comments:
Post a Comment