चेन्नई, : आयपीएलच्या काल झालेल्या लिलावात एक अजब योगायोग पाहायला मिळाला. आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाइट रायडर्स हा संघ आहे. पण लिलावात जेव्हा शाहरुख खानचे नाव घेण्यात आले तेव्हा काही लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. पण ही गोष्ट नेमकी आहे तरी काय, ते जाणून घ्या... भारताच्या सिनेसृष्टीतील एक अजब गोष्ट या आयपीएलच्या लिलावातही पाहायला मिळाली. कारण या लिलावात शाहरुख खान या खेळाडूला लिलावात सामील करण्यात आले होते. हा शाहरुख खान हा चेन्नईचा क्रिकेटपटू आहे. काही दिवसांपूर्वीय सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळवण्यात आली होती. त्यावेळी शाहरुखने धडाकेबाज कामगिरी केली होती. त्यामुळे तेव्हापासून त्याचे नाव चर्चेत यायला सुरुवात झाली होती. या लिलावात शाहरुखला आपल्या संघात घेण्यासाठी बरेच संघ उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी बऱ्याच संघांमध्ये चुरस सुरु झाली होती. शाहरुखची बेस प्राइज ही २० लाख एवढी होती. पण त्याला तब्बल ५.२५ कोटी रुपयांना पंजाब किंग्सच्या संघाने आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. शाहरुखला आपल्या संघात दाखल केल्यानंतर प्रीती झिंटाने जल्लोषही केल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या लिलावापूर्वी प्रीतीने एक सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली होती. त्यामध्ये प्रीतीने लिहिले होते की, " आयपीएलच्या लिलावासाठी मी चेन्नईमध्ये आलेली आहे. पण हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे की, तुम्हाला आमच्या संघाच्या जर्सीमध्ये कोणत्या खेळाडूंना पाहायला आवडेल? तुम्ही जे सांगाल ते मी नक्कीच ऐकेन." प्रीतीच्या या पोस्टवर सर्वात लवकर कमेंट पाहायला मिळाली ती श्रीशांतची. कारण श्रीशांतच्या आयपीएलच्या कारकिर्दीची सुरुवात ही पंजाबच्या संघापासूनच झाली होती. श्रीशांतने यावेळी प्रीतीला आपल्यालाच निवडण्यासाठी सांगितले. श्रीशांत नेमकं प्रीतीला म्हणाला की, " माझे नाव लिलावाच्या याचीत नव्हते. त्यामुळे तुम्ही जर मला संघात घेतले तर तुम्हाला कोणतीच किंमत चुकवावी लागणार नाही. त्यामुळे कदाचित तुम्ही मला संघात घेण्याचा विचार करु शकता."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37tXOKV
No comments:
Post a Comment