अहमदाबाद, : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली, यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीने भाष्य केले आहे. विराट कोहली सामन्यानंतर म्हणाला की, " खरं सांगायचं तर मला वाटतं दोन्ही संघांतील फलंदाजांना यावेळी चांगली फलंदाजी करता आली नाही. दोन्ही संघांतील फलंदाजांकडून मोठ्या चुका झाला आणि त्यामुळे हा सामना लवकर संपला, असे मला वाटते. आम्हीही यावेळी आमच्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करू शकलो नाही. कारण या सामन्यातील ३० विकेट्सपैकी २१ बळी हे सरळ आलेल्या चेंडूवर गेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांतील फलंदाजांना यावेळी चांगली कामगिरी करता आली नाही." कोहली पुढे म्हणाला की, " या सामन्यात गोष्टी फार जलदगतीने घडल्या. माझ्यामते दोन्ही संघांतील फलंदाज याला कारणीभूत असू शकतात. कारण त्यांनी चांगली फलंदाजी केली नाही. पण भारताच्या वॉशिंग्टन सुंदरला यावेळी जास्त गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. कारण संपूर्ण सामन्यात त्याने फक्त तीन चेंडू टाकले आणि एक बळीही मिळवला." आर. अश्विनबद्दल कोहली नेमकं काय म्हणाला, पाहा...कोहलीने यावेळी अश्विनची स्तुती केली. तो म्हणाला की, " अश्विनला सर्वांनीच उभं राहून मानवंदना द्यायला हवी. सध्याच्या मॉर्डन क्रिकेटमधील तो एक महान क्रिकेटपटू आहे. आता अश्विनला मी एका नवीन नावाने संबोधित करणार आहे." भारताकडून कसोटीत सर्वात वेगाने ४०० विकेट घेण्याचा विक्रम आता अश्विनच्या नावाववर जमा झाला आहे. हा विक्रम यापूर्वी अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळेने ८५ कसोटीत ४०० विकेट घेतल्या होत्या. मोटेरा कसोटी अश्विनची ७७वी कसोटी आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा विक्रम श्रीलंकेच्या मुथ्थया मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ७२ कसोटीत ४०० विकेट घेतल्या होत्या. भारताकडून ४०० विकेट्स मिळवणारा अश्विन हा चौथा गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स या कुंबळे यांच्या नावाव़र आहेत. कारण कुंबळे यांनी ६१९ विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा क्रमांक लागतो. कपिल देव यांनी आतापर्यंत ४३४ विकेट्स मिळवल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आहे. हरभजनच्या नावावर ४१७ विकेट्स आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qYejGD
No comments:
Post a Comment