चेन्नई, : इंग्लंडच्या संघाने दमदार कामगिरी केलेल्या एका खेळाडूला तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संधी दिली नाही. पण आता त्याच खेळाडूवर आयपीएलच्या लिलावात उड्या पडल्याचे पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्सने यावेळी बाजी मारत इंग्लंडच्या या खेळाडूला आपल्या संघात दाखल केले. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली होती. पण तरीही त्याला तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने संघात स्थान दिले नाही. यापूर्वी मोईन आरसीबीच्या संघाकडे होता. पण त्यांनी त्याला लिलावापूर्वी रिलीज केले होते. आता चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने सात कोटी रुपये मोजत या खेळाडूला संघात स्थान दिले आहे. जवळपास १८ महिन्यांनंतर अष्टपैलू मोईन अलीला भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. अलीने या सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक आठ विकेट्स मिळवले होते. त्याचबरोबर पहिल्या डावात अलीने भारताचा कर्णधार विराट कोहलीला शून्यावर क्लीन बोल्ड केले होते. त्याचबरोबर या डावात अलीने अजिंक्य रहाणेला बाद केले होते. दुसऱ्या डावात कोहलीने अर्धशतक झळकावले असले तरी यावेळीही अलीनेच त्याला बाद केले होते. त्याचबरोबर या डावातही अलीनेच अजिंक्यलाही बाद केले होते. या सामन्यात अलीने फक्त १० चेंडूंमध्ये पाच षटकार मारण्याची किमयाही साधली होती. दुसऱ्या डावात अलीने तुफानी फलंदाजी केली होती. अलीने यावेळी फक्त १८ चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ४३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. इंग्लंडकडून दुसरा कसोटी सामना हा अलीने गाजवला होता. त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नव्हती. पण तरीही तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या संघा इंग्लंडने अलीला स्थान दिलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी यांच्यामध्ये चांगलीच स्पर्धा लागली होती. १४ कोटी २५ लाख रुपये मोजत अखेर आरसीबीने मॅक्सवेलला आपल्या संघात स्थान दिल्याचे पाहायला मिळाले. स्मिथची बेस प्राइज होती ती २ कोटी. स्मिथला या किंमतीमध्येच संघात घेण्यासाठी आरसीबीचा संघ उत्सुक होता. पण त्यानंतर दिल्लीच्या संघाने २ कोटी २० लाख रुपयांची बोली स्मिथवर लावली आणि त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतले. आयपीएलचा लिलाव सुरु झाला तो करुण नायरपासून. पण यावेळी करुणला कोणीही संघात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. त्यानंतर बोली लागलेला स्मिथ हा पहिलाच खेळाडू ठरला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s36wHz
No comments:
Post a Comment