
अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात मोटेरा स्टेडियम ( नवे नाव- नरेंद्र मोदी स्टेडियम) तिसरा कसोटी सामना सुरू आहे. डे-नाइट या सामन्याच्या आधी स्टेडियमचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री ( ) आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत होते. वाचा- मोटेरा स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आल्यानंतर बोलताना अमित शहा म्हणाले, हे मैदान जवागल श्रीनाथ यांच्यासाठी खास आहे. ते या सामन्यात मॅच रेफरी आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोटेरा मैदानावर ६ विकेट घेतल्या होत्या आणि विजय मिळवून दिला होता. कपिल देव यांनी रिचर्ड हेडली यांच्या सर्वाधिक विकेटचा विक्रम याच मैदानावर मोडला होता. तर सुनिल गावस्कर यांनी कसोटीत १० हजार धावा येथेच केल्या होत्या. वाचा- या मैदानावर आजपासून सुरू होणाऱ्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज ( )ने द्विशतक करावे आणि इंग्लंडविरुद्ध भारताला विजय मिळून द्यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. वाचा- पुजाराने जेव्हा इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे अखेरची कसोटी खेळली होती तेव्हा त्याने द्विशतक केले होते. अमित शहांनी पुन्हा तशी कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या. गेल्या काही काळात पुजाराने शतक झळकावले नाही. असे असेल तरी त्याने अनेक महत्त्वाच्या क्षणी संघाचा डाव सावरला आणि सामना जिंकून किंवा ड्रॉ करून दिला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZLQdTA
No comments:
Post a Comment