नवी दिल्ली: जागतिक क्रिकेट, भारतीय क्रिकेट, भारतीय चाहते आणि मास्टर ब्लास्टर () या सर्वांच्यासाठी २४ फेब्रुवारी ही तारीख खास अशी आहे. जागतिक वनडे क्रिकेटच्या इतिहासात ही तारीख तर सुवर्ण अक्षरात लिहली गेली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका फलंदाजाने द्विशतक झळकावले होते. वाचा- आजच्या दिवशी २०१० साली ग्वालियर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताच्या सचिन तेंडुलकरने नाबाद २०० धावा केल्या होत्या. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात ३ बाद ४०१ धावा केल्या होत्या. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद ११४ धावानंतर देखील आफ्रिकेला २४८ धावांपर्यंत मजल मारता आली होती. या सामन्यात श्रीसंतने सर्वाधिक ३, आशिष नेहरा, रविंद्र जडेजा आणि युसूफ पठाण यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. वाचा- पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करण्याचा पहिला मान सचिन तेंडुलकरला मिळाली. सचिनने द्विशतक करताच ग्वालियलमधील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सचिनने १४७ चेंडूत २५ चौकार आणि ३ षटकारांसह २०० धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १३६ इतका होता. सचिन शिवाय भारताकडून दिनेश कार्तिकने ८५ चेंडूत ७९ धावा केल्या. तर धोनीने ३५ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. वाचा- सामना झाल्यानंतर सचिन म्हणाला, हे द्विशतक मी सर्व भारतीयांना समर्पित करतोय. ज्यांनी गेल्या २० वर्षात माझ्या प्रत्येक चढ-उतारात साथ दिली. या पलिकडे काय बोलायचे मला माहित नाही. मी जेव्हा २०० धावांच्या जवळ पोहोचलो तेव्हा वाटले की द्विशतक करू शकतो. वनडेतील पहिल्या द्विशतकासह सचिनच्या नावावर सर्वाधिक कसोटी सामने (२००) खेळण्याचा विक्रम आहे. त्याने ४६३ वनडे खेळले आहेत. तर एक टी-२० सामाना खेळला आहे. वनडेत सचिनच्या नावावर १८ हजार ४२६ तर कसोटीत १५ हजार ९२१ धावा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NVyzdv
No comments:
Post a Comment