नवी दिल्ली : गेल्यावर्षी करोनामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आशिया चषकाचे आयोजन यावर्षी करण्यात येणार आहे. पण यावर्षी होणारा आशिया चषक रद्द होऊ शकतो, असे दिसत आहे. त्याचबरोबर आशिया चषक रद्द होण्याचे खापर आता भारतावर फोडत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी आशिया चषकामधून पहिल्यांदा भारताने माघार घेतली होती. त्यानंतर आशिया चषक हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यावर्षी पुन्हा आशिया चषक भारतामुळेच रद्द होऊ शकतो, असे दिसत आहे. भारतामुळे आशिया चषक कसा रद्द होऊ शकतो, याचे कारण पाकिस्तानने सांगितले आहे. भारतामुळे आशिया चषक पुन्हा कसा रद्द होऊ शकतो, पाहा... यावर्षी आशिया चषकाचे आयोजन जून महिन्यात करण्यात आले आहे. पण यावर्षी जून महिन्यात विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरीत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा संघ पोहोचला आहे. पण भारतीय संघाची या अंतिम फेरीत पोहोण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. कारण भारतीय संघाने सध्याच्या घडीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे या मालिकेतील चौथा सामना निर्णायक असणार आहे. या चौथ्या सामन्यात जर भारतीय संघ पराभूत झाला तर त्यांना अंतिम फेरीत पोहचता येणार नाही. भारताऐवजी यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो. पण चौथा सामना जर अनिर्णीत राहीला तर इंग्लंडविरुद्धची मालिका भारतीय संघ २-१ अशा फरकाने जिंकू शकतो आणि ते अंतिम फेरीत स्थान पटकावू शकतात. त्याचबरोबर जर भारतीय संघाने चौथा सामना जिंकला तर त्यांची मालिकेत ३-१ अशी आघाडी होईल आणि भारतीय संघ थेट अंतिम फेरीत पोहोचू शकेल. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी यावेळी सांगितले की, " गेल्यावर्षी आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले होते, पण ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. आता ही स्पर्धा श्रीलंकेमध्ये जून महिन्यात खेळवण्याचे ठरले होते. पण आशिया चषक आणि विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या तारखा या जवळपास सारख्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा आशिया चषक रद्द होऊ शकतो. त्यामुळे आता आशिया चषकाचे आयोजन २०२३ साली होऊ शकते, असे आम्हाला वाटते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZXGdql
No comments:
Post a Comment