सुरत: २०२१ () मध्ये भारतीय युवा खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत. पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड यांची शतक असो की वैभव आरोडाची हॅटट्रिक, युवा खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. अशात भारतीय संघातील एका खेळाडूने विस्फोटक अशी फलंदाजी केली. वाचा- स्पर्धेत सोमवारी त्रिपुरा आणि बडोदा यांच्यात झालेल्या सामन्यात बडोदाने ६ विकेटनी विजय मिळवला. त्यांचा हा सलग दुसरा विजय ठरला. दोन सामन्यातील दोन विजयासह त्यांनी ग्रुप एमध्ये तिसरे स्थान मिळवले. त्रिपुराने प्रथम फलंदाजी करत ३०३ धावा केल्या होत्या. विजयाचे लक्ष्य बडोदाने ६ चेंडू शिल्लक ठेवून पार केले. वाचा- बडोदाकडून कर्णधार क्रुणाल पंड्या ()ने ९७ चेंडूत नाबाद १२७ धावा केल्या. यात २० चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. तर विष्णु सोलंकी ९७ धावांवर बाद झाला. क्रुणालने फक्त धावा केल्या नाही तर त्याने एक विकेट देखील काढली. इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी क्रुणालला भारतीय संघात स्थान दिले गेले नाही. पण त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची निवड झालेली नाही. जर क्रुणालने अशाच पद्धतीने कामगिरी केली तर भारतीय संघात त्याची निवड होऊ शकते. याआधी गोव्या विरुद्ध झालेल्या सामन्यात क्रुणालने ७१ धावा केल्या होत्या आणि ३ विकेट काढल्या होत्या. वाचा- हार्दिक पंड्याचा भाऊ असलेला क्रुणालने भारतीय संघाचे टी-२० मध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्याने १८ सामन्यात १२१ धावा आणि १४ विकेट घेतल्या आहेत. पण यावेळी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याचा संघात समावेश होऊ शकला नाही. विजय हजारे ट्रॉफीत अशीच धमाकेदार कामगिरी केल्यास त्याचा भारतीय संघात वनडेसाठी समावेश होऊ शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pL3c2j
No comments:
Post a Comment