नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव झाला होता. एपिल महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आठ संघ जोरदार प्रयत्न करत असताना एका गोष्टीमुळे बीसीसीआयचे टेन्शन वाढले आहे. गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे आयपीएलचे आयोजन नियोजित वेळेत झाले नव्हते त्याच बरोबर ही स्पर्धा भारता ऐवजी युएईमध्ये प्रेक्षकांशिवाय आयोजित करावी लागली होती. आता देशात पुन्हा एकदा करोना रुग्ण वाढल्यामुळे आगामी हंगामातील सामने मुंबईत न होण्याची शक्यता आहे. या वर्षी आयपीएलचे आयोजन भारतात करण्याचा विचार करत आहे. पण महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे बोर्डाला आता दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागणार आहे. वाचा- मुंबईसह राज्यातील काही शहरात करोना व्हायरसचे रुग्ण सातत्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या आयोजनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एका वृत्तानुसार बीसीसीआय आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी ४-५ पाच स्थळांचा विचार करत आहे. याआधी मुंबईच्या वानखेडे, ब्रेबोर्न, डीवायपाटील, रिलायन्स स्टेडियम या ठिकाणी बायो बबल तयार करून स्पर्धा घेण्याचा विचार होता. पण आता करोनामुळे ही गोष्ट अशक्य वाटत आहे. वाचा- मुंबईत करोना रुग्ण वाढल्यामुळे आता बीसीसीआय दुसऱ्या पर्यायाचा विचार करत आहे. स्पर्धा सुरू होण्यास फार कालावधी शिल्लक नाही. बीसीसीआयकडून हैदराबाद, बेंगळुरू आणि कोलकाता सारख्या शहरात सामने घेतले जाऊ शकतात. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्लेऑफ आणि फायनलची मॅच होऊ शकते. वाचा- करोनामुळे गेल्यावर्षी आयपीएलचा १३वा हंगाम ६ महिने उशिरा सुरू झाला होता. तेव्हा दुबई, शारजाह आणि अबुधाबी या ३ ठिकाणी सामने झाले होते. १९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली स्पर्धा १० नोव्हेंबरला संपली होती. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3krTtwO
No comments:
Post a Comment