अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी मैदानाचे नाव बदलण्यात आले आहे. हे मैदान म्हणून ओळखले जाते होते. त्यानंतर त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली आणि सरदार पटेल असे नाव करण्यात आले होते. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या स्टेडियमचे नाव पुन्हा एकदा बदलण्यात आले आहे. वाचा- मोटेरा क्रिकेट स्टेडियम आता या नावाने ओळखले जाणार आहे. वाचा- २०१५ साली हे स्टेडियम पूर्णपणे पाडण्यात आले आणि नव्याने त्याची निर्मिती करण्यात आली. या नव्या स्टेडियममध्ये आधुनिक सुविधा निर्माण केल्या. जुन्या मैदानाची प्रेक्षक क्षमता ५३ हजार इतकी होती. आता या मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी झाली आहे. वाचा- ६३ एकर परिसरात असलेल्या या मैदानावर ऑलिपिंक साइझचे स्विमिंग पूल आहे. तर चार ड्रेसिंग रूम आहेत. स्टेडियमच्या परिसरात बॉक्सिंग , बॅडमिंटन, टेनिस आणि अन्य कोर्ट आहेत. या परिसरात हॉकी आणि फुटबॉल मैदान देखील आहेत. या मैदानाचे खास वैशिष्ट म्हणजे प्रत्येक ड्रेसिंग रुमला जिम आहे. जे क्रिकेटच्या मैदानावर कधीच पाहायला मिळत नाही. मोटेरा येथील जुने मैदान १९८२ साली बांधण्यात आले होते. आता या नव्या मैदानासाठी ७०० कोटी रुपये खर्च आला. हे मैदान दोन वर्षात बांधून पूर्ण झाले. गुजरात क्रिकेट असोसिएशनद्वारे बांधण्यात आलेले हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. याआधी प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदान सर्वात मोठे होते. त्याची क्षमता १ लाख इतकी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2P8dKMv
No comments:
Post a Comment