कराची: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचे चाहते आज देखील आहेत. धोनी प्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू आहेत जे त्याच्या पद्धतीने हेलिकॉप्टर शॉट मारतात. धोनीच्या या शॉटची चर्चा पुन्हा होण्याचे कारण म्हणजे एका खेळाडूने हेलिकॉप्टर शॉटला अपग्रेड केले आहे. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या टी-२० लीग स्पर्धा पाकिस्तान सुपर लीगमधील आहे. या स्पर्धेत रविवारी लाहोर कलंदर आणि पेशावर जल्मी यांच्यातील लढतीत आफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने एक शॉट खेळला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- राशिद खानने धोनीसारखा हा शॉट खेळला पण त्यात थोडा बदल होता. राशिदने मारलेला चेंडू थेट सीमारेषेबाहेर गेला आणि त्यासह त्याने संघाला विजय देखील मिळवून दिला. वाचा- पेशावर संघाने प्रथम फलंदाजी करत १४० धावा केल्या होत्या. लाहोर संघाने ही लढत ९ चेंडू राखून जिंकली. राशिदने चार षटकात फक्त १४ धावा दिल्या आणि १५ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २७ धावा केल्या. राशिदच्या या शॉटचे सर्वजण कौतुक करत आहेत. इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू सारा टेलरने देखील सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले. हा शॉट कसा मारायचा हे मला देखील शिकव असे साराने म्हटले आहे. धोनी प्रमाणे हेलिकॉप्टर शॉट मारण्याची राशिद खानची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील त्याने अशाच प्रकारे अनेक टी-२० लीग स्पर्धेत हा शॉट खेळला होता. पण यावेळी त्यात थोडा बदल केला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MaQ7BG
No comments:
Post a Comment